
मृत्यूचा खेळ! रीलच्या नादात जीव टाकला धोक्यात... रेल्वे ब्रिजवर लटकत तरुणाने केला धोकादायक स्टंट; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, एक माणूस रेल्वे पुलाच्या वर आणि खाली दोन्ही ठिकाणी स्टंट करताना दिसत आहे. पहिल्या क्लिपमध्ये, तो रुळांच्या मध्ये उभा राहून व्यायामासारखा धोकादायक पराक्रम करतो. दुसरा क्लिप आणखी धोकादायक आहे. तो माणूस पुलाखालून लटकत आहे आणि पुल-अप करत आहे, ज्यामुळे असे दिसते की तो रुळांवर नाही तर मृत्यूच्या शिडीवर लटकत आहे. याच्या खाली एक तलाव देखील दिसून येत आहे जे पाहून आणखीन भिती वाटते की जर तरुणाचा हात सुटला तर यात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. व्हिडिओत तरुणाचा फिटनेस आणि साहस स्पष्ट दिसून आला ज्याचे काैतुक करावे तितके कमी आहे पण हा स्टंट प्रचंड धोकादायक ही त्याची सत्यता आहे. अनेकांनी आतापर्यंत धोकादायक स्टंटच्या नादात आपला जीव गमावला आहे ज्यामुळे व्हूजच्या नादात आपला जीव धोक्यात घालणे एक चुकीचा निर्णय ठरतो.
हा व्हायरल व्हिडिओ @fitneeskit नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आहे की, ‘करुन दाखवा’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “भावाच्या फिटनेसला सलाम” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बापरे हात सुटला तर भावाचा विषयच संपून जाईल” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मला आश्चर्य वाटते की त्याने हे कसं केलं”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.