
19 minute viral video
माकडाने केले सिंहीणीचे हाल बेहाल…झाडावर चढताच जंगलाच्या राणीला तव्याने हाणलं अन्… Video Viral
काय आहे त्या १९ मिनिटं, ३४ सेकंदाच्या व्हिडिओ
मिळालेल्या माहितीनुसार, हा १९ मिनिटं, ३४ सेकंदाचा व्हिडिओ एका कपलचा खाजगी क्षणांचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर लीक झाला असून वेगाने पसरत आहे. लोक व्हिडिओतील कपल कोण आहेत, याचा शोध घेत आहेत. यामध्ये अनेक इन्फ्लुअन्सर्सची, कंटेट क्रिएटर्सची नावे जोडली जात आहे. अनेक ठिकाणी मीम्सवर लोक १९ मिनिटे अशी कमेंट करत आहे. हा व्हिडिओ १ कोटी ६० लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. याचा ब्लर इमेजवरुन इतर मुलींशी तुलना केली जात आहे.
शिवाय याच वेळ आणखी एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका मुलीचा मृतदेह जमिनीवर पडलेला दिसत आहे. या व्हिडिओत दावा केला जात आहे की, १९ मिनिटांचा खासगी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या मुलीने आपले जीवन संपले आहे. ही मुलगी या जगात नाही असा दावा सर्वत्र केला जात आहेत. तसेच व्हिडिओ लीक करणाऱ्यांवर तीव्र टीका केली जात आहे. मात्र आतापर्यंत या व्हिडिओत नेमंक कोण आहे, हा व्हिडिओ कुठून व्हायरल झाला, कोणी केला हे स्पष्ट झालेले नाही. या व्हायरल व्हिडिओमुळे मेघालयामधील एक मुलगी ट्रोलिंगचा शिकार बनली आहे.
फॅक्ट चेंकिग केल्यानंतर हे लक्षात आले आहे की, मृत महिलेचा आणि १९ मिनिटांच्या व्हिडिओतील महिलेचा कोणताही संबंध नाही. दोन्ही घटना वेगळ्या आहेत. मृत महिलेचा व्हिडिओ जुना आहे, त्याच्या मागचे कारणही वेगळ आहे. या दोन्ही क्लिप्स बनावट असल्याचे म्हटले जात आहे. या व्हिडिओमुळे सायबर गुन्हेगारी पुन्हा सुरु झाली असल्याचे लक्षात येते. सध्या या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर सायबर सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळे अनेकांनी कोणत्याही चुकीच्या किंवा आक्षेपहार्य वाटणाऱ्या लिंकवर क्लिक न करण्याचा इशारा दिला आहे.
व्हायरल पोस्ट
The phrase “19-minute viral video” is dominating Indian social media, sparking confusion and concern over AI deepfakes. The chaos led to influencer Sweet Zannat being falsely identified as the woman in the clip and being flooded with accusations. She was forced to publicly… pic.twitter.com/Xwi7g914IJ — Talk Nerdy (@TalkNerdyto) December 2, 2025
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.