Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Video: ‘तेव्हा’च्या आजींचा लूक पाहून आजची पिढीही थक्क; ५० वर्षं जुन्या पासपोर्टचा फोटो व्हायरल

Viral Video: घराची साफसफाई करताना एका तरुणीला तिच्या आजीचा तब्बल ५० वर्ष जुना पासपोर्ट सापडला. २६ नोव्हेंबर १९७६ रोजी जारी झालेला हा पासपोर्ट १९८१ पर्यंत वैध होता. मात्र पासपोर्टवरील आजींच्या तरुणपणीच्या फोटोने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 18, 2026 | 04:36 PM
Viral Video: ‘तेव्हा’च्या आजींचा लूक पाहून आजची पिढीही थक्क; (फोटो सौजन्य- AI)

Viral Video: ‘तेव्हा’च्या आजींचा लूक पाहून आजची पिढीही थक्क; (फोटो सौजन्य- AI)

Follow Us
Follow Us:
  • १९७६ सालचा आजींचा ५० वर्ष जुना पासपोर्ट सापडला.
  • तरुणपणीच्या फोटोने सोशल मीडियावर वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष.
  • व्हायरल व्हिडिओवर आजींच्या जुन्या फोटोचं भरभरून कौतुक.
 

Old Passport Photo: कधी कधी घराची साफसफाई करताना अशा काही वस्तू सापडतात की जुन्या आठवणी जाग्या होतात. असंच काहीसं एका घरात झालं. एका तरुणीला तिच्या आजीचा ५० वर्ष जुना पासपोर्ट सापडला आणि तो पाहून सगळेच थक्क झाले.

हा पासपोर्ट १९७६ सालचा आहे. म्हणजे जवळपास ५० वर्ष जुना. या पासपोर्टवर तारीख आहे २६ नोव्हेंबर १९७६. आणि तो १९८१ पर्यंत वैध होता. पण या पासपोर्टमध्ये सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे आजींचा तरुणपणचा फोटो.

आजींचा फोटो पाहून सगळे घायाळ

तरुणपणी आजी इतक्या सुंदर दिसत होत्या की फोटो पाहून कोणीच विश्वास ठेवणार नाही. अगदी बॉलिवूड हिरोईन सारखा लूक. त्यांची हेअर स्टाईल, त्यांचं स्मित, सगळंच एकदम भारी. त्यावेळी त्या विद्यार्थी होत्या.

हा व्हिडिओ sysaeyd नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये तो पूर्ण पासपोर्ट दाखवला आहे. पासपोर्टवर लखनऊ असा उल्लेख आहे. पासपोर्टची कंडिशन पण अजून चांगली आहे. लोकांनी कमेंटमध्ये तर आजींचं भरभरून कौतुक केलं आहे. कोणी म्हणतंय हा पासपोर्ट म्युझियममध्ये ठेवायला पाहिजे. इतका सुंदर पासपोर्ट आजपर्यंत पाहिला नाही.

नेटकरी काय म्हणतायत?

हा व्हिडिओ आतापर्यंत ११ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. आणि शेकडो कमेंट्स आल्या आहेत.एका युजरने लिहिलंय – “आजी, तुम्ही तरुणपणी खूपच सुंदर दिसत होतात.” दुसरा म्हणतोय – “मी पण लखनऊचाच आहे, तुमची आजी खूपच गोड दिसत आहेत.”

Viral Video: दरवाजा उघडताच पिटबुलची बाळावर झडप; बाळ रक्तबंबाळ, VIDEO पाहून डोळ्यात पाणी

एका युजरला तर आपल्या आजीची आठवण आली, तो म्हणाला – “माझ्या आजीकडे पण पोर्तुगालचा पासपोर्ट आहे, ती गोव्याची आहे.”
तर एकाने लिहिलंय – “आजींनी तरुणपणी नक्कीच खूप मुलांची मनं जिंकली असतील.” प्रत्येक जण आजींच्या सौंदर्याचं आणि त्या जुन्या पासपोर्टचं कौतुक करतोय.

१९७६ चा पासपोर्ट आणि आताचा पासपोर्ट – किती फरक?

हा व्हिडिओ पाहिला की एक गोष्ट लक्षात येते, १९७६ चा पासपोर्ट आणि आजचा २०२६ चा पासपोर्ट यात जमीन-अस्मानचा फरक आहे. जुना पासपोर्ट एकदम साधा होता. फक्त बेसिक माहिती – नाव, फोटो, तारीख, ठिकाण. कसलीच जास्त सिक्युरिटी नव्हती. हाताने लिहिलेलं.

पण आजचा पासपोर्ट बघा. त्यात किती तरी सिक्युरिटी फीचर्स आहेत. मशीन रीडेबल कोड आहे, चिप आहे, ई-पासपोर्ट आलाय. फोटो पण डिजिटल.पण त्या जुन्या पासपोर्टमध्ये एक वेगळीच गोष्ट होती. एक आठवण होती. तो कागद नाही तर एक काळ होता. तो काळ जेव्हा लोक परदेशात जाणं म्हणजे खूप मोठी गोष्ट मानायचे.

Bangladesh Street Food Viral Video: झालमुरीमध्ये चक्क लेग पीस! बांगलादेशातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

हा पासपोर्ट म्हणजे फक्त एक कागद नाही, तर आजींच्या तरुणपणाची, त्यांच्या स्वप्नांची आठवण आहे. ५० वर्षांपूर्वी त्या काय विचार करत असतील, कुठे जायचं प्लॅन करत असतील, हे सगळं त्या पासपोर्टमध्ये दडलंय.म्हणूनच लोक म्हणतायत, हा पासपोर्ट खरंच म्युझियममध्ये ठेवण्यासारखा आहे. कारण तो फक्त आजींचा नाही, तर त्या काळाचाच एक पुरावा आहे.

Web Title: 50 year old passport grandmother youthful photo viral vintage look

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 04:36 PM

Topics:  

  • Instagram News
  • Marathi News
  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video: फोनच्या नादात आईकडून भयंकर चूक; बाळाला फ्रिजमध्ये ठेवलं अन्…; पुढे जे घडलं ते फारच भयानक!
1

Viral Video: फोनच्या नादात आईकडून भयंकर चूक; बाळाला फ्रिजमध्ये ठेवलं अन्…; पुढे जे घडलं ते फारच भयानक!

National Insurance Apprentice Jobs: सरकारी विमा क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी! ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करण्याची मुदत
2

National Insurance Apprentice Jobs: सरकारी विमा क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी! ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करण्याची मुदत

Mumbai Redevelopment: मुंबईत पुनर्विकासाची लाट; भाडे बाजारपेठेला तेजी, घरांच्या परताव्यात वाढ
3

Mumbai Redevelopment: मुंबईत पुनर्विकासाची लाट; भाडे बाजारपेठेला तेजी, घरांच्या परताव्यात वाढ

QS Asia University Rankings: संशोधन क्षेत्रात भारताचा डंका! IISc बंगळुरू आशियात प्रथम; PHD पदवीधारकांमध्येही भारत आघाडीवर
4

QS Asia University Rankings: संशोधन क्षेत्रात भारताचा डंका! IISc बंगळुरू आशियात प्रथम; PHD पदवीधारकांमध्येही भारत आघाडीवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.