
Viral Video: दरवाजा उघडताच पिटबुलची (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
हरियाणा मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोनीपतमध्ये एका पाळीव पिटबुल कुत्र्याने फक्त 6 महिन्यांच्या छोट्या बाळावर हल्ला केला. ही घटना एवढी भयानक आहे की बघून अंगावर काटा येईल. सगळ्यात संताप येणारी गोष्ट म्हणजे जेव्हा तो कुत्रा त्या छोट्या बाळाला चावत होता, तेव्हा त्याचा मालक तिथेच निवांत उभा होता. त्याला काहीच पडलेलं नव्हतं. Viral Video:
सोनीपतमध्ये दुपारच्या वेळेत ती बाई आपल्या सहा महिन्याच्या बाळाला शेजारच्या सोबत गप्पा मारत होती. शेजारच्याचा घरातील दरवाजा उडताच एक कुत्रा अगदी जोरात धावत आला आणि बाळावर क्रुर हल्ला केला. सदर प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि व्हिडिओ सोशलमीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की कुत्रा बाळाला सोडतच नाहीये आणि त्याचा मालक म्हणजे ज्याला आपण डॉग पेरेंट म्हणतो, तो अगदी आरामात बघत उभा आहे. त्याने लगेच कुत्र्याला बाजूला पण केलं नाही. बाळ खूप गंभीर जखमी झालं आहे. त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं आहे. त्याची अवस्था चिंताजनक आहे असं सांगितलं जात आहे.
Pitbull pet attacks 6 month old kid in Sonipat Haryana. Check how relaxed is the Pitbull owner, sorry parent, while the dog was brutally attacking the kid. Kid is severely injured, in hospital. But Dog Lovers will still defend it. Justify it by saying dog must be hungry,… pic.twitter.com/K2LSXf8tUK — Ankur Singh (@AnkurSingh) September 17, 2026
पिटबुल ही कुत्र्याची जात मुळातच खूप आक्रमक मानली जाते. अनेक देशांमध्ये या जातीच्या कुत्र्यांना पाळायला बंदी पण आहे. कारण हे कुत्रे कधी कसे वागतील याचा काहीच भरवसा नसतो. ते एकदा पकडलं की सोडत नाहीत.भारतामध्ये पण अनेकवेळा पिटबुलने लहान मुलांवर आणि मोठ्या माणसांवर हल्ला केल्याच्या बातम्या आल्या आहेत. तरी पण लोक हौस म्हणून यांना घरी पाळतात.
या सगळ्या प्रकरणात सगळ्यात जास्त दोष त्या मालकाचा आहे. तुम्ही एवढा खतरनाक कुत्रा घरात पाळता, जिथे लहान बाळ आहे, आणि त्याला मोकळं सोडता, याला बेजबाबदारपणा नाही तर काय म्हणायचं? त्या मालकावर कडक कारवाई झालीच पाहिजे. जर पाळीव कुत्रा कोणावर हल्ला करतो, तर त्याची पूर्ण जबाबदारी मालकाची असते.
सरकारने पण पिटबुल सारख्या धोकादायक जातींवर बंदी आणली पाहिजे किंवा त्यासाठी कडक नियम बनवले पाहिजेत.आज ते 6 महिन्याचं बाळ हॉस्पिटलमध्ये जीवन-मरणाच्या दारात आहे. उद्या दुसऱ्या कोणाच्या घरात असं होऊ नये म्हणून आता तरी सगळ्यांनी डोळे उघडले पाहिजेत. हौस म्हणून कुत्रा पाळण्याआधी हजार वेळा विचार करा, कारण तुमच्या एका चुकीमुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो.