
Bangladesh Street Food Viral Video: झालमुरीमध्ये चक्क लेग पीस! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
आपण रस्त्यावरची झालमुरी खाल्ली असेलच. मुरमुरे, कांदा, शेव, चटणी टाकून बनवलेली साधी झालमुरी. पण बांगलादेशात एका माणसाने झालमुरीचा असा प्रकार बनवला आहे की तो बघून लोक वेडे झाले आहेत. इंस्टाग्रामवर एका फूड ब्लॉगरने एक व्हिडिओ टाकला होता. त्या व्हिडिओमध्ये एक माणूस चिकन टाकून झालमुरी बनवत आहे. हा व्हिडिओ आता जोरात व्हायरल झाला आहे. जवळपास 2 कोटी लोकांनी तो व्हिडिओ बघितला आहे. लोक काय बोलत आहेत, हे पदार्थ कसं बनतं, चला बघूया. Bangladesh Street Food Viral Video:
व्हिडिओमध्ये दिसतंय की तो विक्रेता आधी एका मोठ्या भांड्यात मुरमुरे घेतो. मग त्यात तो चिकनची ग्रेव्ही ओततो. नुसती ग्रेव्ही नाही तर त्यात कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून टाकतो.मग त्यात हिरवी चटणी आणि गोड चटणी टाकतो. त्यानंतर त्यात उकडलेल्या बटाट्याचा चिवडा करून टाकतो. सगळं मिश्रण हाताने चांगलं कालवतो.आणि सगळ्यात शेवटी, सगळ्यात भारी गोष्ट तो करतो.
तो एक अख्खा चिकन लेग पीस घेतो आणि त्या झालमुरीत टाकतो. मग हातानेच ते चिकन कुस्करून त्या मुरमुऱ्यांमध्ये मिक्स करतो. वरून परत कांदा आणि कोथिंबीर टाकून कागदाच्या डब्यात देतो. दिसायला हा पदार्थ बिर्याणीसारखा पण वाटतो आणि झालमुरीसारखा. Viral Video:
Bangladesh just gave jhalmuri a wild upgrade — puffed rice, spices & a full chicken leg piece on top 🍗🍚🔥 Street food innovation at its finest 😳#Jhalmuri #StreetFood #Bangladesh #ViralFood pic.twitter.com/i70vjJUWKi — jeetwinapk (@jeetwin_apk) September 12, 2026
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर लोकांनी खाली खूप कमेंट्स केल्या आहेत.एकाने लिहिलंय, “आता तर हे लोक हातमोजे पण वापरायला लागले, बघून बरं वाटलं.” दुसऱ्या एकाने लिहिलंय, “अरे देवा, मला हे आत्ताच खायचंय.”एका माणसाने तर त्याला “बांगलादेशी लोकांची बिर्याणी” असं म्हटलंय. कारण त्यात चिकन आणि भातासारखे मुरमुरे आहेत.
Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल
.पण सगळ्यांनाच हे आवडलं असं नाही. एका माणसाने लिहिलंय की, “माझं पोट खूप नाजूक आहे, मी हे कधीच खाणार नाही.”खरं तर सोशल मीडियामुळे आता असे वेगवेगळे पदार्थ आपल्याला बघायला मिळतात. कोणी पाणीपुरीमध्ये आईस्क्रीम टाकतंय, तर कोणी झालमुरीमध्ये चिकन. खायला कसं लागत असेल माहित नाही, पण बघायला मात्र एकदम भारी वाटतं. तुम्हाला ही चिकन झालमुरी खायला आवडेल का?