(फोटो सौजन्य: Instagram)
भारताचं Venice माहितीय का? परदेशी पर्यटाकाचा ‘तो’ व्हिडिओ पाहून भारतीय म्हणून वाटेल अभिमान
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, वृद्ध जोडपे हळूहळू समुद्राच्या पाण्यात पाऊल ठेवताना दिसून येतात. लाटा त्यांच्या पायांनी स्पर्श करत असतात आणि त्या हळूवार लाटांचा स्पर्श होताच दोघांच्याही चेहऱ्यावर हलका उत्साह आणि आनंद पसरतो. नारंगी लुगडं आणि पांढरे धोतर परिधान केलेले आजी आजोबा हात धरून समुद्रकिनारी उभे असतात. ते क्षणभर थांबतात, समुद्राकडे पाहतात आणि नंतर आदराने हात जोडून नमस्कार करतात. जणू समुद्रकिनारा पाहून त्यांच जीवनच सार्थकी लागलं. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, ‘ते एखाद्या सहलीबद्दल किंवा समुद्रकिनाऱ्याबद्दल नव्हते. ते त्यांना अशा गोष्टी पाहण्यासाठी घेऊन जाण्याबद्दल होते ज्याबद्दल त्यांनी आयुष्यभर फक्त ऐकले होते. समुद्र पाहण्याची त्यांची पहिलीच वेळ. त्यांना पाण्याला स्पर्श करताना आणि नमस्कार करताना पाहणे म्हणजे शुद्ध श्रद्धा कशी दिसते याची आठवण करून देते. काही क्षण हे कायमचे हृदयात राहतात’.
Labubu ला केला रिप्लेस, Mirumi ने केला ट्रेंड सेट! अरे गोंडसपणाला काही हद्द, Viral Doll
हा व्हिडिओ @shortgirlthingss नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “डोक्यावर पदर अन् टोपी असणारी शेवटची जोडी” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “थरथरत्या हातांनीही एकमेकांचा हात किती घट्ट धरून ठेवलाय,मिस यू आजीदादा” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ते किनारपट्टीच्या भागांपासून खूप दूर राहत होते आणि त्यांना त्यांच्या गावाबाहेर जाण्याची संधी कधीच मिळाली नाही. त्यांच्यासाठी जीवन म्हणजे जबाबदाऱ्या, कठोर परिश्रम आणि त्यांच्या मुलांचे भविष्य चांगले असावे याची खात्री करणे. त्या काळात प्रवास किंवा समुद्र पाहण्यासारखे अनुभव कधीच प्राधान्य नव्हते. दुसरीकडे, आपण भाग्यवान आहोत की आपण शहरात राहतो, कुठेही, कधीही प्रवास करण्याचे स्वातंत्र्य आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






