
Viral Video
अशा वेळी व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ लोकांना खऱ्या प्रेमाची जाणीव करुन देणार आहे. प्रेमाला वयाचे बंधन नसते याचा प्रत्यय या नात्यातून आला आहे. तसेच प्रेम असून चालत नाही तर व्यक्तही करता आले पाहिजे. यासाठी महागड्या-मोठ मोठ्या गिफ्टची गरज नसते. तर एकमेकांचा आदर, छोटे सरप्राइज, फुल देणं किंवा जोडीदारासोबत वेळ घालवणेही पुरसे आहे. सध्या असेच काही या आजोबांनी केले आहे. आजोबांनी आजीच्या वाढदिवसाला खास सरप्राइज दिले आहे. त्यांनी वाढदिवस साजरा करण्यासाठी केक आणला आहे. दोघांनी केक कट करुन एकमेकांना भरवल्यानंतर आजोबांनी आणखी एक खास सरप्राइज दिले आहे. आजोबांनी आजीला त्यांच्या आवडची लिपस्टीक दिली आहे. जी पाहून आजींच्या गालावर गुलाबी लाली चढली आहे. आजी खूप आनंदात आहे. एवढेच नाही तर आजी ती लिपस्टिक लावत असताना त्यांच्यासाठी आजोबा आरसा घेऊनही उभे आहेत.
व्हायरल व्हिडिओ
Elderly man surprises wife with cake & makeup set on birthday: wholesome video goes viral🥹🫶🏻
pic.twitter.com/tSG8S2sWUQ — rareindianclips (@rareindianclips) January 10, 2026
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @rareindianclips या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी हेच खरे प्रेम असतं असे म्हटले आहे. तर काहींनी हार्टचे इमोजी शेअर केले आहे. एका नेटकऱ्याने किती क्युट अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर आणखी एकाने प्रेम आयुष्याच्या शेवटापर्यंत जपता आलं पाहिजे असे म्हटले आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या प्रचंड पसंतीस पडत आहे.
फक्त इथपर्यंत साथ हवी! आजीच्या नखांना नेलपेंट लावताना दिसले आजोबा; हृदयस्पर्शी VIDEO व्हायरल
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.