
London Street Video
या ३० मिनिटांच्या व्हिडिओमध्ये तिने लंजडनच्या काही भागातींल रस्त्यांचे दृश्य दाखवले आहे. फुटपाथवर, भितींवर पान-गुटख्याचे लाल डाग या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या दृश्यांमुळे लंडनसारख्या विकसित देशामध्ये देखील अस्वच्छतेचा प्रश्न समोर आला आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडाली असून अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी याचा थेट आरोप भारतीयांवर, पाकिस्तानी आणि बांगलादेशी समुदायावर केला आहे. मात्र वास्तुस्थिती पाहता कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणे योग्य नाही. व्हिडिओमध्ये माहिती सांगताना ही घाण नक्की कोणी केली हे ब्रक डेविसने सांगितलेले नाही. तिने केवळ काही समुदायाच्या लोकांनी हे केले असल्याचे म्हटले आहे. मात्र या व्हिडिओमुळे नेटकऱ्यांमध्ये युद्ध छिडले आहे. भारतीयांवर थेट आरोप केल्याने सर्वांनी संताप व्यक्त केला आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. यावर भारतीयांवर झालेल्या आरोपांना भारतीयांनी प्रत्युत्तर दिले आहे. एका भारतीयाने हे चुकीचे आहे आम्ही याचे समर्थन करत नाही असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका व्यक्तीने असे करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई केली पाहिजे असे म्हटले आहे. आणखी एकाने सगळ्याच्या घाणरेड्या प्रकारांमध्ये भारतीय सामील नसतात असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
अजब-गजब! जपानमधील अनोखं मंदिर जिथे लोक टक्कल पडू नये म्हणून केस अर्पण करतात
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.