
Udaipur
पण या पर्यटकाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न केला आहे. त्याने विचारले आहे की, उदयपूर हे सर्वात सुंदर शहर असूनही इतर पर्यटन स्थळांसारखे लोकप्रिय का नाही? त्याच्या या प्रश्नावर सध्या सर्वजण चर्चा करत आहेत. रोरी पोर्टर असे या परदेशी पर्यटकाचे नाव असून त्याने गेल्या वर्षी दोन वेळा भारताल भेट दिली होती. त्याने आपल्या व्हिडिओमध्ये उदयपूरला भारताचे व्हेनिस म्हटले आहे. त्याने याची तुलना पूर्वेकडील व्हेनिसशी केली आहे.
उदयपूर हे १९५९ च्या काळात महाराणा उदय सिंह द्वितीय यांनी स्थापित केले होते. एकेकाळी मेवाडची राजधानी असणारे हे शहर आज राजस्थानचे पर्यटन केंद्र आहे. या शहरावर मुघालांना कधीही पूर्णपणे ताबा मिळवता आला नाही. या ठिकाणी आजही अनेक राजे-महाराजेंच्या घराणेशाही आहे. राजवाडे आणि वारसा मालमत्ता देखील आहे. रोरीच्या मते, हे शिहर आरामदायी, आणि अनेक मनोरंजक गोष्टींनी भरलेले आहे. या शहराला त्याने रोमँटिक शहर आणि शांत कमी गर्दीचे शहर म्हटले आहे. येथील नजारा पाहून तो मोहक झाला आहे.
Labubu ला केला रिप्लेस, Mirumi ने केला ट्रेंड सेट! अरे गोंडसपणाला काही हद्द, Viral Doll
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ रोरी ने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर @roryporter.1 शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी यावर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. एका नेटकऱ्याने, हे शहर व्हेनिसपेक्षाही चांगले असल्याचे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने उदयपूर आशियातील दुसरे सर्वात सुंदर शहर असल्याचे म्हटले आहे. तर उदयपूरच्या लोकांनी रोरीचे स्वागत केले आहे. सध्या हा व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस पडत आहे.
Chinese Trump चा हा व्हिडिओ पाहिला का? बोलण्याची स्टाईल पाहून तुम्हीही डोकं खाजवाल, Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.