
Viral News Young Drunk man bites of poisonous snake
मिळालेल्या माहितीनुसार, एका तरुणाला विषारी सापाने दंश केला होता. यावेळी तरुण दारुच्या नशेत असल्याने त्याला राग आला. या तरुणाने रागाच्या भरात त्या सापाला दातांनी फाडून टाकले. त्यानंतर तरुण सापाला घेऊन बेडवर झोपला. सकाळी जेव्हा तरुणाच्या कुटुंबीयांनी बेडवरील दृश्य पाहिले तेव्हा सगळेच हादरुन गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार, वेकंटेश असे या तरुणाचे नाव होते.
सांगितले जात आहे की, थोट्टंबेडूमधील चिय्यावरम येथे ही घटना घडली. वेंकटेश रात्री दारु पिऊन घरी निघाला होता. यावेळी त्याला एका विषारी सापाने दंश केला. यामुळे तरुणाला प्रचंड राग आला होता. तरुणाने रागात सापाला उचलेले आणि त्याला दातांनी चावून चावून फाडून टाकले. यानंतर तो सापाला तसाच बेडवर घेऊन झोपला. सकाळी त्याच्या घरातील लोकांनी हे दृश्य पाहिले त्यावेळी त्यांना धक्काच बसला. साप मृत असवस्थेत पडलेला होता. तर वेंकटेश बेशुद्धावस्थेत होता.
बघता बघता ही घटना संपूर्ण गावभर पसरली. वेकंटेशला बघण्यासाठी संपूर्ण गाव त्याच्या घराबाहेर जमा झाले होते. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, वेंकटेशला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या संपूर्ण अंगात विष पसरले होते. यामुळे त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. गुरुवारी १८ सप्टेंबर रोजी ही घटना घडली होती. शुक्रवारी (१९ सप्टेंबर) जेव्हा वेंकटेशला सुद्ध आली तेव्हा त्याला घटनेबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी त्याने सांगितलेल्या घटनाक्रमाने सगळ्यांनाच धक्का बसला होता. सध्या या विचित्र घटनेने आंध्र प्रदेशात मोठी खळबळ उडाली आहे.
माणुसकी गेली कुठे? पावसामुळे ऑर्डर उशिरा मिळाल्याने डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण, VIDEO VIRAL
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.