माणुसकी गेली कुठे? पावसामुळे ऑर्डर उशिरा मिळाल्याने डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण, VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Karnatka Viral Video : अलीकडे लोकांमधील माणुसकी हरवत चालली आहे. लोक कोणत्याही शुल्लक कारणावरुन रागाच्या भरात लोकांना बेदम मारहाण करत आहेत. असाच एक एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. हा व्हिडिओ कर्नाटकची राजधानी बंगळुरूमधील आहे. डिलिव्हरी बॉयला पावसामुळे उशिर झाल्याने त्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. बेंगळुरुतील बायतरायणपुरा येथे मैसूर रोडजवळही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, डिलिव्हरी बॉयला मारहाण करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन तरुण डिलिव्हरी बॉयला डोक्यात हाणत आहेत.त्याच्या डोक्यात कोणत्या तरी वस्तूने वार करतात. तसेच त्याची गाडी पाडण्याचा प्रयत्न करतात. त्याने दिलेले पार्सल देखील फेकून देतात. डिलिव्हरी बॉयला पावसामुळे एक तास उशिर झाला होता. यामुळे त्याला मारण्यात आले. तरुणांनी नॉन-व्हेज ऑर्डर केले होते. पण मुसळधार पावसामुळे डिलिव्हरी बॉयला उशिर झाला. तरुणांना उशिराने त्यांचे खाण्याचे पार्सल मिळाले, यामुळे त्यांना खूप राग आला होता. या वेळी दोघांनी डिलिव्हरी बॉयसोबत भांडयाला सुरुवात केली. भांडण इतके वाढले की, दोघांनी त्याला बेदम मारहाण केली. तसेच पेमेंट देण्यासही नकार दिला.
Food Delevery boy Assaulted over a late delivery – Bengaluru pic.twitter.com/4DyieO2d2l
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) September 20, 2025
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापरर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी व्हिडिओ व्हायरल होताच तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनत आहे. अनेकांनी माणुसकी हरवत चालले असल्याचे म्हटले आहे. त्या डिलिव्हरी बॉयला केवळ पावसामुळे उशिर झाला होता, त्याने जाणूबुजून केला नव्हता. यामुळे बिचाऱ्याला मारहाण करण्याची गरज नव्हती असे म्हटले आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.