
Viral Stunt Video
अलीकडे सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी, लाईक्स आणि व्ह्यूजसाठी धोकादायक स्टंट करण्याचे प्रचंड प्रमाण वाढले आहे. या तरुणाने देखील रिलसाठी असेच काही कृत्य केलं आहे. तरुण एका नदीवर असलेल्या रेल्वे पुलावर उभा राहिला आहे. याच वेळी दुसऱ्या बाजून वाऱ्याच्या वेगाने एक ट्रेन येते आहे. परंतु तरुणाला आपल्या जीवाची कोणतीही काळजी नाही. ट्रेन अगदी त्याच्या जवळ आल्यानंतर त्याने नदीत उडी मारली आहे. परंतु त्याला नदीत उडी मारालयला एक सेकंदही लेट झाला असता तर त्याचा जीवही गेला असता. यामुळे सध्या हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. गेल्या काही काळात अशा धोकादायक स्टंटचे प्रमाण वाढले आहे. लोक रिलसाठी आपला, आपल्या आसपासच्या लोकांचा जीव धोक्यात घालत आहेत. जीवापेक्षा लोकांना आता प्रसिद्धी महत्त्वाची वाटू लागली आहे.
व्हायरल व्हिडिओ
बस एक सेकंड और लेट हुए होते तो यमलोक का टिकट कट जाता.!💀❌️
👇 pic.twitter.com/wrHUQyhoUi — TAHKEEK..A (@Tahkeek_KSA) January 11, 2026
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Tahkeek_KSA या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. याव व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. परंतु अनेकांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. जीव धोक्यात घालून काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे? असा प्रश्न एकाने केला आहे तर दुसऱ्या एकाने हे लोक स्वत:चा नाही, तर कुटुंबाचा देखील विचार करत नाही असे म्हटले आहे. तर काहींनी अशा तरुणांमुळेच समाज बिघडत चालला असल्याचे म्हटले आहे.
विराट कोहलीसारखा दिसणारा हा मुलगा आहे तरी कोण? पाहून स्वतः किंग कोहली झाला अवाक्; युजर्स म्हणाले, “बस 19-20…”; Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.