हे भगवान! एका बाईकवर 8 जण अन्...; पाहून पोलिसही हैराण, व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे मजेशीर व्हिडिओ पाहायला मिळतात. तसेच तुम्ही स्टंटचे, भांडणाचे याशिवाय जुगाडाचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. जुगाड करणाऱ्यांचे तर अनेकदा असे भन्नाट व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून हसू आवरणे कठीण होते.
काही जुगाड असे असतात की, त्याचा उपयोग आपल्या जीवनात करता येईल पण काही असे असतात की, त्यावर हसावे की रडावे कळत नाही. जुगाड करणाऱ्यांचे म्हणणे असते की यामुळे त्यांच्या वेळ वाचतो आणि पैसाही. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. असा जुगाड पाहून पोलिसांनीच हात जोडले आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून पाहून तुम्ही देखील हैराण व्हाल.
तुम्ही बऱ्याचदा पाहिले असेल की, लोक काही वेळा दुचाकीवर ट्रीपल सीट किंवा चौपल, पाचजण जातात. पण या पठ्ठ्याने चक्क आठ जणांना बाईकवर बसवले आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक बाईकस्वार पोलिसांशी बोलत आहे. त्याच्या बाईकवर एकूण आठजण बसलेले दिसत आहे. त्याच्या मागे पाचजण आणि पुढे तीनजण बसलेले आहेत. हे पाहून पोलिस हैराण झाले आहेत. ते त्याला विचारतात की, कुठे चालला आहे तर ते जत्रेसाठी चालले असल्याचे सांगतात. एवढेच नाही तर बाईकवर काही सामानही बांधलेले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
एक बाइक पर आठ सवारी
अगर हो गया हादसा तो किसकी जिम्मेदारी?वायरल वीडियो शाहजहांपुर का बताया जा रहा है… pic.twitter.com/SNnhU2paJv
— Chandramani Shukla (@chandramanishu7) November 15, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ उत्तरप्रदेशातील असल्याचे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी .यावर आपल्या प्रतिक्रीया देकील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, वाढत्या महागाईमुळे असे केले असेल बिचाऱ्याने,. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, पेट्रालच्या वाढत्या किंमतीमुळे हा निर्णय घेतला असेल. अशा प्रतिक्री लोकांनी दिल्या आहेत व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफर्म एक्सवर @chandramanishu7 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.