viral video a biker was waiting quietly at the signal and see what hoppens next
सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. काही असे व्हिडिओ असताता की पाहून हसू आवरणे कठीण होते, तर काही असे व्हिडिओ असतात की व्हिडिओत दिसणाऱ्या व्यक्तीसाठी आपल्याला वाइट वाटते. बहुतेक वेळा काही लोकांसोबत सर्व गोष्टींचे पालन करुन, तसेच शांत राहूनही सतत काही ना काही गडबड होत असते. अशा लोकांसाठी अनेकदा बिचाऱ्याची भावना मनात येते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती शांतपणे वाहूतकीच्या नियमांचे पालन करत आहे. तो सिग्नलवर बाईक घेऊन उभा आहे. सिग्नल ग्रीन होण्याची वाट तो बघत आहे. इतक्यात त्याच्यासोबत असे काही घडते ज्याची त्याने कल्पाना देखील केली नसेल. तुम्ही व्हिडिओत पाहू शकता की, दुसऱ्या बाजूने एक गाडी येते आहे. गाडी वेगात असून चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यासारखे वाटते आहे. कार चालक ब्रेक लावण्याचा प्रयत्न करत आहे पण गाडीचा ब्रेक फेल झाल्यासारखे वाटते. तुम्ही पाहू शकता की, त्या गाडीने बाईक वाल्याला जोरदार धडक दिली आहे. सुदैवाने त्याच्यासोबत कोणतीही दुर्घटना घडलेली नाही. पण तो चांगलाच जोरात पडला आहे. त्यानंतर बाईकस्वार हळू हळू उठताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडिओ
हालात जब अच्छे नहीं होते तो खड़े खड़े भी ठोकर लग जाती है। pic.twitter.com/w8zmCXyKRZ
— 𝐔𝐩_𝟐𝟒𝐤 (@UP_24k) August 18, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देत बाईकस्वाराला बिचार म्हटले आहे. एका युजरने भावाची परिस्थिती खूपच वाईट दिसत आहे असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने अनेकदा लाईफमध्ये प्रॉम्बलेम्स चारही बाजूने येतात असे म्हटले आहे. आणखी एकाने कार चालक नक्कीच मद्यधुंद अवस्थेत असणार असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.