(फोटो सौजन्य: Youtube)
जंगलात शिकारीचे अनेक अद्भुत आणि नवनवीन दृश्ये नेहमीच रंगत असतात आणि याचे व्हिडिओज देखील बऱ्याचदा सोशल मीडियाद्वारे आपल्या डोळ्यासमोर येतात. आता जंगलात जगायचं म्हणजे खाण्या-पिण्यासाठी संघर्ष हा करावा लागणारच. जंगलात नेहमीची कुणाची ना कुणाची शिकार होते… मोठे प्राणी लहान प्राण्यांना मारून त्यांवर आपला उदरनिर्वाह करतात आणि यालाच आपण जीवनचक्र म्हणतो जे सतत सुरु असतं. पण तुम्हाला माहिती आहे का? जंगलात फक्त शिकार कारणंच महत्त्वाचं नाही तर इथे आपण केलेली शिकार दुसऱ्या शिकाऱ्यापासून वाचवणे देखील तितकेच महत्त्वाचे असते आणि यातूनच शिकाऱ्यांचा आपला संघर्ष सुरु होतो. अशीच काहीशी घटना बिबट्यासोबतही घडून आले आहे ज्यात बिबट्याची शिकार बळकावण्याच्या प्रयत्नात एक तरस खाली आपला डाव मांडून बसल्याचे दिसते पण बिबट्या शेवटी आपली अशी शक्कल लढवतो की अखेर त्याची शिकार त्याच्या हाताबाहेर जाणे अशक्य होऊन बसते. चला नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.
‘या’ पुरुषामुळे मिळाले 7 महिलांना गर्भवती राहणाचे सुख, महिलांशी लैंगिक संबंध ठेवले अन्…
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात जंगलातील खुल्या मैदानातील एक दृश्य दिसून येत आहे ज्यात एका झाडावर बिबट्या आपल्या शिकाऱ्यासह बसला आहे. बिबट्याने नुकतीच एका हरणाची शिकार केल्याचे यात दिसत आहे. आपली शिकार इतर प्राण्यांपासून सुरक्षित राहावी म्हणून तो मृत हरणाचे शरीर झाडावर घेऊन गेलेला असतो. तर व्हिडिओत खाली आपल्याला एक तरस देखील घिरट्या घालत असल्याचे दिसून येते. एक शिकार आणि दोन शिकारी अशा परिस्थिती एक चूक बिबट्यापासून त्याची शिकार हिरावून घेऊ शकते. पुढे व्हिडिओत बिबट्याच्या हातून त्याची शिकार म्हणजेच हरणाचे मृत शरीर खाली पडताना दिसते जे पाहताच तरस त्याच्यावर आपला निशाणा साधतो पण बिबट्याने अनेक पावसाळे पाहिलेले असतात. आपली शिकार खाली पडली आहे हे समजताच तो लगेच वाऱ्याच्या दिशेने खाली जातो आणि आपली शिकार लगेच झाडावर घेऊन पुन्हा त्याचा आनंद लुटू लागतो. बिबट्याची ही जलद प्रतिक्रिया सर्वांनाच थक्क करून सोडते तर तरसाच्या हाती मात्र अपयश लागते.
दरम्यान जंगलातील शिकारीचा हा व्हायरल व्हिडिओ @MalaMalaGameReserve नावाच्या युट्युब अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तरस हे एखाद्या प्रकल्पातील त्या सदस्यांसारखे असतात जे कोणतेही प्रयत्न न करता श्रेय मिळवू इच्छितात” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “शक्ती, ताकद, वेग, चपळता! बिबटे म्हणजे डॉन!” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तरस फ्रीच्या अन्नाची वाट पाहत बसला होता”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.