Viral Video: सिंहांच्या टोळीने म्हशीला घेरले अन् मारायला जाणार तेवढ्यात...; तुम्हीच पाहा काय झाले?
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो तर अनेकदा गमतीशीर व्हिडिओ पाहायला मिळतात. वन्य प्राण्यांचे देखील अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. कधी मजेशीर दृश्य पाहायला मिळतात तर कधी भनायक असे दृश्य तुम्ही पाहिले असतील. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यात सिंह, म्हैस आणि हत्तींचा समूह दिसत आहे. म्हशीला पाहताच सिंहांच्या टोळीने शिकार करायला सुरुवात केली. पण तेवढ्यात असे काही झाले की सिंहांनी तिथून पळता पाय काढला. हा व्हिडिओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे की, सगळे घाबरले आणि म्हशीला जीवदान मिळाले.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सिंहांचा एक गट भक्ष्याच्या शोधात जंगलात भटकत असल्याचे दिसून येत आहे. अचानक त्याची नजर म्हशीवर पडते. मग सिंहाच्या टोळीने म्हशीला घेराव घातला आहे. सगळे मिळून त्याची शिकार करणार होते इतक्यात असे काही घडते की सगळे सिंह तिथून पळून जातात. वास्तविक, अचानक एक जंगली हत्ती तिथे येतो. हत्ती पाहताच सिंहांनी म्हशीला सोडून दिले आणि तिथून पळता पाय काढला आहे. हा व्हिडिओ अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @wildtrails.in या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, जंगलाचा खरा राजा हत्ती आहे तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, स्वत: गणपती बाप्पांनी तिचे प्राण वाचवले आहेत. तर आणखी एका युजरने म्हटले की, मी तर पहिल्यांदाच असे काही बघितले, तर अनेकांनी सिंहावर हसले आहे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.
हे देखील वाचा – Viral Video: व्यक्तीने जुगाड करून बनवली अशी वॉशिंग मशीन की; पाहून लोक म्हणाले…