भारतीय मुलांना डेट करण्याचे ऑस्ट्रेलियन तरूणीने सांगितले कारण; नेटकरी म्हणाले...
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहिल्यावर डोळ्यांवर विश्वास बसत नाही. तर अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात जे पाहून हसू आवरता येत नाही. तुम्ही सोशल मीडियावर अनेक परदेशी लोकांचे व्हिडिओ देखील पाहिले असतील. अनेकदा हे लोक भारतातील लोकांबद्दल आपले मत मांडतात ज्याचे व्हि़डिओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सध्या असाच एक ऑस्ट्रेलियन तरूणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
या तरूणीने जर भारतीय मुलांना का डेट करावे याचे कारण या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारतात परदेशी व्यक्तीशी डेटिंग करण्याबाबत जवळपास एकमत नाही. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की परदेशी महिलांना भारतीय पुरुषांशी डेटिंग करण्याबद्दल काय वाटते किंवा त्यांचे मत काय असेल? या तरूणीने याबाबत आपले मत मांडले आहे. महिलेने भारतीयांना डेट करण्याबाबत मत व्यक्त केले आहे.
भारतीय मुलांना डेट करण्याबद्दल परदेशी मुलगी काय म्हणते?
या ऑस्ट्रेलियन तरूणीचे नाव बोट ब्री स्टील आहे. एका व्हिडिओमध्ये तिने एका भारतीय मुलांना डेट करण्याचा अनुभव तिच्यासाठी कसा होता हे शेअर केले आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 2023 मध्ये ती भारतात आली होती असे ब्री स्टीलने तिच्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. भारतातील मुलांना डेट करण्याचा काय कारण आहे व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे. भारतीय मुलांची तुलना तिने ऑस्ट्रेलियातील मुलांशीशी केली.
व्हिडिओमध्ये तिने दोन्ही देशांमध्ये प्रचलित असलेल्या डेटिंग संस्कृतीबद्दल सांगते. तिने म्हटले आहे की, “ऑस्ट्रेलियामध्ये विनोदी शैलीत फ्लर्ट करतात. पण भारतात तसे नाही. तिने तिच्यासोबत घडलेल्या एका घटनेची आठवण करून देताना म्हणते की, “मी एका पार्टीत होते आणि एका भारतीय व्यक्तीने फ्लर्ट करताना अचानक माझा हात पकडला. ऑस्ट्रेलियात असे कधीही होणार नाही. असे ती म्हणते.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडिओवर आपले मतही मांडले आहेत. एका युजरने म्हटले आहे की, भारतात कोणतेही डेटिंग कल्चर नाही. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, आता अलीकडे भारतातील मुले-मुली पाश्चिमात्त संस्कृती आत्मसात करत आहेत, तर आणखी एका युजरने म्हटले आहे की, भारतातील प्रत्येक मुले स्वत:ला हिरो समजतात, चौथ्या एका युजरने म्हटले आहे की, बरोबर आहे तुझे. हा व्हिडिओ तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर breestlee.mp3 या अकाऊंटवर पाहू शकता.