viral video bihar love story girl fall in love with electrcian
प्रेम ही एक अशी भावना आहे जी कधी कोणत्या रुपात, कुठे प्रकट होईल, कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी हृदयावर अधिकारी गाजवणारी आहे. प्रेमात लोक सात समुद्र पार करण्याच्या, जीवन मरण्याची शपथ घेतात. सध्या एक विचित्रच प्रेम कथा व्हायरल होत आहे. यामध्ये प्रेमकथेचा नायक एक पंखा आहे. होय… तुम्ही बरोबर वाचलात. बिहारच्या एका जोडप्याला पंख्यामुळे प्रेम झाले आहे. सध्या ही विचित्र पण रंजक गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जाणून घेऊयात नेमकं काय घडलं.
तर घडलं असं की, बिहारमधील एका तरुणीच्या घरी पंखा बिघडला होता. यामुळे तिने एका इलेक्ट्रिशियनला बोलावून घेतलं. त्यानंतर इलेक्ट्रिशयन पंखा दुरुस्त करुन दिला. या दुरुस्तीदरम्यान दोघांच्या मनात प्रेमाच्या भावना उमलू लागल्या. इलेक्ट्रिशियनने पुन्हा काही बिघाड झाल्यास फोन करा असे म्हणून आपल्या नंबर देऊन तरुणीचा नंबर घेतला. इथूनच या प्रेमकथेची सुरुवात झाली. सुरुवातील पंखा दुरुस्ती करण्याच नातं, नंतर मैत्रीत बदललं आणि हळूहळू प्रेमात बदललं. त्यानंतर दोघांचं नातं घट्ट झालं आणि दोघांनी आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही लग्न केले. सध्या त्यांच्या प्रेम काहीणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
Leave beginners Bihar is not for legends even 😂
“Pankha theek karte karte pyaar ho gaya , shadi kar li🙏🏻” pic.twitter.com/I63UwO7q6I
— Amitabh Chaudhary (@MithilaWaala) April 6, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @MithilaWaala या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये प्रेमी जोडपे आपली प्रेमकथा सांगत आहे. तरुण म्हणतो की, मी तिला पंखा दुरुस्त करुन देत होतो पण ती माझ्या जीवनाचा भाग बनली. तरुणी सांगते की, ती त्याला आधीपासूनच प्रेम करत होती. ही गोष्ट हसवण्यासारखी असली तरी अगदी छोट्याशा आणि साध्या गोष्टीतून सुरु होणारी आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, पंखा दुरुस्त करायला शिकून घेतलं पाहिजे. तर दुसऱ्या एका युजरने मी तर पंखा(चाहता) झालो या माणसाचा. तर तिसऱ्या एकाने पंखा एक प्रेमकथा असे म्हटले आहे. अनेकांनी हसण्याचे इमोजी देखील शेअर केले आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.