तरुणाईला लाजवेल असा आजीबाईंचा हुरुप; सत्तरीमध्ये डोक्यावर ओझं घेऊन जाणारी, Video बघून व्हाल थक्क (फोटो सौजन्य: सोशल मीडिया )
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. कधी असे व्हिडिओ पाहायला मिळतात की पाहून हसावे की रडावे कळत नाही. तर कधी असे व्हिडिओ पाहायला मिळतात की आपण कौतुक केल्याशिवाय राहत नाही. कधी प्रेरणा देणारे व्हिडिओ देखील आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक आजीबाईंचा भावूक पण प्रेरणा देऊन जाणारा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
आपल्या आयुष्यात कितीही अडचणीं आल्या तरी त्या अडचणींवर मात करुन कसे जगायचे हे या आजीकडून शिकायला हवे. एका तरुणाने हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये एक आजी नउवारी साडी नेसून, डोक्यावर वेचलेल्या कचऱ्याचे पोती घेऊन जाताना दिसत आहे. तुम्ही व्हिडिओक एकू शकता की, व्हिडिओ बनवणारा व्यक्ती आजीला आरामात जावा असे म्हणत आहे. आजी बाटल्या वेचत असताना तो पाहतो, आणि तिला काही बाटल्या देतो. तसेच बोलता बोलता ती त्याला त्याच्या परिवाराबद्दल सांगते.
यावरुन लक्षात येते की, तिचा मुलगा करोनामध्ये गेल्या आणि तिच्या कुंटूंबात तीची नातवंडे आणि सुन राहतात. घराच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आजी कचरा वेचण्याचे काम करते. आजीचे वय 70 आहे. हे पाहून तुमच्या डोळ्यात पाणी येईल. अनेकदा जीवनात असे कठीण प्रसंग येतात की, या प्रसंगात आपली माणसे देखील आपल्याजवळ नसतात. अशा वेळी खचून न जाता त्या संकटाचा सामना करायचा हे या व्हिडिओतून लक्षात घेण्यासारखे आहे. शिवाय, एक महिला देखील घराची जबाबदारी घेऊ शकते हे देखील या व्हिडिओतून शिकायला मिळते.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @aditya_deshmukh_asd या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर अनेकांच्या पसंतीस पडत आहे. अनेकांनी यावर आपल्या भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहे. एका युजरने म्हटले आहे की, प्रत्येकाचे आयुष्य हे संघर्षाने भरलेले आहे. दुसऱ्या एका युजरने माझी आई अशीच होती… नऊवारी नेसणारी… कधी न थकणारी… मुलांसाठी जीवाची रान करणारी असे म्हटले आहे. अनेकांनी यावर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.