मज्जा म्हणून माकडाशी मस्ती करणं चिमुकल्याला पडलं महागात; कुंगफू करायला गेला अन्.... VIDEO व्हायरल
सोशल मीडिया रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. स्टंट, जुगाड, भांडण, डान्स रिल्स असे अनेक व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. तसेच तुम्ही लहान मुलांचे देखील पाहायला मिळतात. अनेकदा ही चिमुकले काया खोडी काढतील सांगता येत नाही. अशे खोडकरपणा य लगानग्यांना महागात देखील पडतात. सध्या असाच एका चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
यामध्ये या चिमुकल्याला एका माकडाशी पंगा घेणे महागांत पडले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात एका लहान मुलाचा आणि माकडाचा कराटे पाहायला मिळत आहे. एक छोटा मुलगा माकडाला पाहून त्याच्याशी कुंग फू लढण्याचा प्रयत्न करतो. मुलगा माकडाच्या दिशेने धाव घेतो आणि त्याच्यासमोर कराटे मूव्हज दाखवतो. त्याला वाटते की माकड घाबरेल, पण प्रत्यक्षात माकडाने जे केले ते पाहून सगळेच हसून लोटपोट झाले आहेत.
नेमकं काय घडलं?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगा माकडाच्या जवळ जाताच त्याला घाबरवायचा प्रयत्न करतो. माकड मात्र शांतपणे काही वेळ त्याला पाहत असते. असे वाटते की तो मुलाचे वागणे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण अचानक, माकड असे काही करते की, त्या चिमुकल्याला महागांत पडते. माकड मुलावर जोरदार पलटवार करते. माकड इतक्या वेगाने मुलावर हल्ला करते की, मुलगा गोंधळून जातो आणि तिथून पळ काढतो. मुलाच्या घाबरून पळून जाण्याचा हा क्षण प्रेक्षकांसाठी अत्यंत मजेदार ठरत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ angel_of_sky22 या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे आणि त्याला हजारो लाइक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे आणि लोकांच्या प्रतिक्रिया खूप मजेशीर आहेत. अनेकजणांना व्हिडिओ पाहून हसू आवरले नाही. काही जण मात्र असेही म्हणत आहेत की प्राण्यांशी असे वर्तन टाळायला हवे. मुलाचा माकडाला घाबरवण्याचा प्रयत्न आणि त्याला मिळालेला प्रतिसाद यामुळे प्रेक्षक हसत आहेत. या व्हिडिओमधून लोकांना प्राणी आणि माणसांमधील नाते अधिक चांगल्या प्रकारे समजावे, तसेच प्राण्यांशी सन्मानाने वागण्याचे महत्त्वही पटावे, असे लोकांनी म्हटले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.