थोडक्यात बचावला! मित्राच्या सांगण्यावरुन म्हशीला बाहेर काढण्यासाठी आत घुसला अन्...; पाहा VIDEO, नेमकं काय घडले?
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. कधी मनोरंजक तर कधी चित्र-विचित्र गोष्टी आपल्याला पाहायला ऐकायला मिळतात. डान्स, स्टंट, जुगाड आणि असे अनेक मजेदार आश्चर्यकारक अशा गोष्टी व्हायरल होत असतात. तसेच प्राण्यांशी संबंधितही अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. माणूस आणि प्राण्यांचे नाते अनेक वर्षापासून तुम्ही पाहिले असेल. आपण जसे आपल्या घरातील लोकांना जीव लावतो तसेच प्राण्यांनाही लावतो. प्राणी देखील आपल्यावर जास्त जीव लावतात.
पण अनेकदा हे मुके जनावर त्यांच्याशी गैरवर्तवणूक झाल्यावर आपल्यावर संतापून उधळतात. आपण प्राण्याला त्रास दिला तर ते आपल्यावर हल्ला करतात. पण काही प्राणी अचानक कधी, कुठे आणि कसा हल्ला करतील हे सांगणे कठीण आहे. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक म्हशीने माणसावर हल्ला केला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील घाम फुटेल. पाहा नेमकं काय घडलं?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एका दुकानात म्हैस शीरलेली आहे. त्या गोदामात लाकडाचे काही सामान दिसत आहे. त्याच वेळी दुकानाच्या शटरजवळ दोन माणसे दिसत आहेत. शटर खालून आर्धेच उघडलेले आहे. दरम्यान एक माणूस आपल्या मित्राच्या सांगण्यावरुन आतमध्ये घुसतो. त्याच्या हातात एक दोरी असते. त्याचवेळी म्हैस घाबरुन दूकानाच्या आत मध्ये जाते. आणि परत माणूस तिच्याकडे तिला पकडम्यासाठी जाणार तेवढ्याच म्हैस उधळते आणि त्याच्यावर धावा बोलते. तो व्यक्ती पटकन पळून उघड्या असलेल्या शटरमधून बाहेर पडतो.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलेला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @vk_reacts_daily या अकाऊंट शेअर करण्याक आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. एका युजरने म्हटले आहे की, भाऊ, थोडक्यात वाचला, चर आणखी एका युजरने म्हटले आहे की, इसे कहते है मोत को छू के टक से वापस आना. तसेच अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहे. मात्र, हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.