
Man Risks Life as Train Approaches, Social Media Users Outraged ( 64 रेल्वे जवळ येत असताना एका व्यक्तीने स्वतःचा जीव धोक्यात घातला; सोशल मीडिया वापरकर्त्यांमध्ये संताप )
या व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण रेल्वे रुळावर एक धोकादायक स्टंट करताना दिसत आहे. त्याच्या या कामगिरीने सोशल मीडिया युजर्स स्टट पाहून थक्क झाले आहेत. व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक आपली मते व्यक्त करत आहेत. अनेक वापरकर्त्यांनी अशा कृतींचा निषेध केला असून, काही लाईक्स आणि व्ह्यूजसाठी आपला जीव धोक्यात घालणे योग्य नाही, असे म्हटले आहे.
रिवर्स मैजिक देखकर मज़ा तो आया 😄 लेकिन भाई ट्रेन की पटरी कोई स्टंट करने की जगह नहीं है।
एक छोटी सी लापरवाही जिंदगी भर का पछतावा बन सकती है अपनी और अपनों की जिंदगी की कीमत समझिए।
स्मार्ट बनिए, सेफ रहिए! https://t.co/Ol6fgOobdA — Kaira (@taslimbano5010) August 3, 2026
व्हायरल व्हिडिओमध्ये, रेल्वे रुळांवरून एक ट्रेन धावताना दिसत आहे. ट्रेन जवळ येत असल्याचे पाहून, एक तरुण प्लॅटफॉर्मवरून रुळांवर उतरतो. ट्रेन पुढे जाऊ लागताच, तो तरुण पूर्ण रुबाबात, ट्रेनकडे तोंड करून, मागे चालताना दिसतो. तो काही क्षण ट्रेनसमोरून चालत राहतो.जेव्हा ट्रेन जवळ येते, तेव्हा तो प्लॅटफॉर्मवर चढतो. व्हिडिओमध्ये पुढे दिसते की, ट्रेन त्या तरुणाजवळ येताच, तो लगेच प्लॅटफॉर्मवर परत चढू लागतो. त्यानंतर व्हिडिओ संपतो.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर, सोशल मीडिया युजर्सने अशा स्टंटचा निषेध करत संताप व्यक्त केला आहे. एका वापरकर्त्याने लिहिले की ” हा देश अशा व्यक्तींनी ग्रासला आहे.”
दुसऱ्या युजर्सने लिहिले, “ते सतत चुकीच्या गोष्टी करत राहतात.”
आणखी एकाने म्हटले, “जीवन मौल्यवान आहे; ते अशा स्टंटवर वाया घालवू नये.”