viral video child got stuck after he open lift door video goes viral
Viral news Marathi: सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. डान्स, जुगाड, भांडण, स्टंटबाजी यांसारखे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. यामध्ये अगदी लहान मुलांचाही समावेश असतो. अनेकदा काही खोडकर मुले असे धोकादायक स्टंट करतात की, ज्यांची पालकांनी कल्पना देखील केली नसेल. यामुळे अनेकदा पालकांना आणि लहान मुलांना गंभीर परिणामांना समोरे जावे लागले. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एका लहान मुलाने लिफ्टमध्ये जीवघेणा स्टंट केला आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक लहान मुलागा लिफ्टमध्ये येतो. लिफ्टमध्ये येताना देखील दरवाजा बंद होण्याच्या वेळी तो आत जाण्याचा प्रयत्न करतो. यामुळे मुलगा दरवाज्यामध्ये अडकला असता. नंतर लिफ्टमध्ये आल्यानंतर त्याला जायच्या असलेल्या फ्लोअरचे बटन प्रेस करतो. लिफ्टवर जायला लागते. याच वेळी लहान मुलगा लिफ्टचा दरवाजा हाताने उघडण्याचा प्रयत्न करतो. धक्कादायक बाब म्हणजे लिफ्टचा दरवाजा उघडला जातो, पण खांबाच्या भींतीसमोर उघडाला जातो. यानंतर दार पुन्हा बंद होते. लिफ्ट वर जात नसल्याचे मुलाचे लक्षात येते.
चिमुकला लिफ्टमध्ये असलेल्या सीसीटीव्हीत बघून मदत मागतो. त्यानंतर पुन्हा एकदा लिफ्टचा दरवाज्या उघडतो परंतु लिफ्ट मध्ये अडकलेली असले. परंतु यामुळे लिफ्ट मध्येच अडकते आणि लहान मुलगा आतामध्ये अडकतो. ही घटना गाझियाबादमध्ये घडली असल्याचे सांगण्यात आले आहे. यानंतर बिल्डिंगचे स्थानिक रहिवासी आणि अधिकाऱ्यांच्या मदतीने बचापूर्वक मुलाला सुखरुप बाहेर काढतात. सुदैवाने मुलाला कोणताही गंभीर दुखापत होत नाही. परंतचु अनेकदा लहाना मुलांच्या खोडकर स्वभामुळे त्यांना गंभीर दुखापत होते. ही सर्व घटना लिफ्टमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेली आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म @jobaajstories या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देण्यात आली आहे. अनेकांनी पालकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. तसेच लिफ्ट आधीच नीट काम करत नव्हती असे म्हटले जात आहे. यामध्ये मुलाची चूक नसल्याचे अनेकांनी म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.