
श्रावणाच्या पहिल्याच सोमवारी चमत्कार? भरधाव ट्रेनची धडक बसूनही गाय उठून उभी राहिली; VIDEO Viral
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात, ट्रेन क्रॉसिंगवरून जात असताना गाईला समोरुन येणाऱ्या रेल्वेची जोरदार धडक बसल्याचे दिसते. या धडकेत गाय दुसऱ्या दिशेला जमिनीवर जोरदार आदळली जाते. ही धडक इतकी मोठी असते की अनेकांना वाटत गायीला मोठी दुखापत झाली असावी. गाैमातेला दुखापत झाल्याचा अनेकांचा समज असतो पण या दुर्घटनेतून ती सुखरुप बाहेर पडते. कोणत्याही दुखापतीशिवाय गाय काही घडलंच नाही अशाप्रकारे तिथून उठते आणि आरामात पुढे चालू लागते. गाईला अपघाताविषयी काही वाटत नसलं तरी उपस्थितांना् हा चमत्कार पाहून मोठा धक्का बसला. अनेकांनी हे दृष्य आपल्या फोनच्या कॅमेरात कैद आले आणि यातीलच एकाने हा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला. श्रावणाच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडून आल्याने अनेकांनी याला देवाचा चमत्कार मानलं आहे तर काहींनी तिचं नशीब चांगलं होत अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हा व्हिडिओ @arvind714yadav नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत ८ लाखाहून अधिकचे लाईक्स मिळाले असून अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओतील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “ज्याचे रक्षण देव करतो, त्याला कोणीही इजा पोहोचवू शकत नाही. हर हर महादेव”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तुम्हाला गाय ट्रेनला धडकल्याचा व्हिडिओ काढायला वेळ मिळतो, पण तिला बाजूला करायला वेळ नसतो”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “हर हर महादेव”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.