बाप रे! चिखलात लपून बसली होती मगर अचानक व्यक्तीवर हल्ला केला अन्...; VIDEO पाहून उडेल थरकाप
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. अनेकदा मनोरंडक तर अनेकदा चित्र-विचित्र, धक्कादायक, थरकाप उडवमारे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. डान्स रिल्स, जुगाड, स्टंट तसेच इतरीही अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. वन्य प्राण्यांशी संबंधित देखील अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. घनदाट जंगलातील रोमांचक सफरीच्या अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
सध्या असाच एक भितीदायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका माणसावर मगरीने अचानक हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. या घटनेने अनेकांची झोप उडवली आहे. मात्र हा व्हिडिओ कुठला आहे आणि कधीचा आहे हे अद्याप कळालेले नाही. पण हा व्हिडिओ पाहून तुमचा देखील थरकाप उडेल. या मगरीने ज्या हुशारीने माणसावर हल्ला केला आहे हे विशेष आहे.
नेमके काय घडले?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक माणूस चिखलाने भरलेल्या दलदलीजवळ उभा असल्याचे दिसत आहे. बहुदा त्याला तिथे मोठी मगर लपून बसली आहे, याची कल्पना येत नाही. तो व्यक्ती पुढे जाण्याच्या तयारीत असताना अचानक चिखलातून मगर झपाट्याने बाहेर पडते आणि त्याच्या दिशेने धावते. ती व्यक्ती थोड्याशा अंतराने वाचते. मोठा अनर्थ घडला असता. मात्र, तो जोरात धावल्याने हालचालींमुळे त्याचा जीव वाचतो, आणि तो मागे सरकत तिथून कसा तरी दूर निघून जातो. सध्या हा थरकाप उडवणार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @jayprehistoricpets या अकाऊंटवर शेअकर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, जेव्हा तुम्ही जंगलात असता, तेव्हा सावध रहा! एका युजरने म्हटले आहे की, भाऊ, मगरपण किती हुशार आहे. आणकी एका युजरने शॉक लागल्याचे इमोजी शेअर केले आहेत. या व्हिडिओला प्रचंड लाईक मिळाले आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.