viral video crocodile pretends to be a human video goes viral
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. कधी मजेशीर तर कधी धक्कादायक व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. स्टंट, जुगाड, डान्स रिल्स आणि भांडण याशिवाय अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या एक वेगळाच व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण आश्चर्यात पडले आहे. यामध्ये एका तलावातून दोन हात अचानक बाहेर आले आहेत, मात्र कोणीही हे पाहून मदतीसाठी पुढे आले नाही. असे करण्यामागचे नेमकं कारण काय आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कारण माणूस हा एक असा प्राणी आहे, जो दुसरे कोणी संकटात असल्यास मदत करण्यास तयार असतो. तसे तर प्रत्येकाचा मदत मागण्याचा हा मार्ग वेगळा असतो. जसे की, एखादा माणूस पाण्यात बुडत असेल, तर चो आपले हातवर करुन मदतीसाठी हाक मारतो. तर कोणी ओरडण्याचा प्रयत्न करतो. हे पाहून इतर लोक त्याच्या मदतीसाठी धावत येतात. परंतु, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ वेगळंच दृश्य दिसत आहे.
नेमकं कारण काय?
व्हायरल होत असलेला व्हिडिओ इंडोनेशियामधला असून यामध्ये एक तलाव दिसत आहे. यामध्ये पाणी वेगाने वाहत असून अचानक दोन हात बाहेर येताना दिसतता. पाहताना असं वाटतं की, कोणीतकरी पाण्याक बुडत आहे आणि मदतीसाठी हाक देत आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे त्या परिस्थातीत तिथे उभे असलेले लोक मदतीसाठी पुढे न जाता हसत आहे. असा प्रश्न निर्माण होतो, की जर एखादं व्यक्ती पाण्यात बुडत असताना लोक हसत कसे असू शकतात?
व्हिडिओ नीट पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, बाहेर आलेल्या दोन हात माणसांचे नाहीत. हे होते तलावातील मगरीचे आहेत. असे व्हिडिओच्या कॅप्शनमध्येदेखील सांगण्यात आले आहे. मगर उलटे होऊन पाण्यातून पाय बाहेर काढत आहे. मगर आपल्या शिकारला फसवण्यासाठी हा प्रकार वापरतात असे म्हटले जाते. त्यांना असं वाटतं की कोणीतरी त्यांचे पंजे हात समजून मदतीसाठी पुढे येईल, आणि मग ते त्यांच्यावर हल्ला करतात.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सुदैवाने, लोकांनी या मगरीच्या या फसवणुकीची पद्धत ओळखली आहे. यामुळे लोक तिच्या जाळ्यात अडकत नाहीत. ही घटना एक महत्त्वाची शिकवण देऊन जाते, की कधीही पहिल्या दृष्टीनुसार एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणे चुकीचे असू शकते, कारण प्राणी देखील आता माणसांना फसवण्यासाठी नवनवीन युक्त्या वापरत आहेत. व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून अनेकजण आश्चर्यात पडलेले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @siasatdaily या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.