पेट्रालचे पैसे न देता पळून जात होता कारचालक इतक्यात...; पाहा VIDEO मध्ये नेमकं काय घडले?
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात की पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात की, पाहून हसू आवरणे कठीण होऊन जाते. डान्स रिल्स, स्टंट, जुगाड भांडण याशिवाय सत्य घटनांचे देखील व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही चोरीच्या घटनांचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सध्या चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. कोण कधी काय चोरी करेल सागंता येत नाही. लोक दिवसाढवळ्या चोरी करत आहेत. फोन चोरी, तर कधी गाडी चोरीला जात आहे. याशिवाय किरकोळ वस्तू देखील चोरीला जात आहे. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पेट्रोलच्या चोरीचा आहे. एक व्यक्ती पेट्रोल गाडीत भरल्यावर पैसे न देता पळून जात होता. तेव्हा पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याने असे काही केले की, त्याला चांगलीच अद्दल घडली असेल. व्हिडिओ पाहून लक्षात येईल की नेमकं काय घडले. पाहा व्हिडिओ.
व्हायरल व्हिडिओत नेमंक काय?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक गाडी पेट्रोल पंपावर उभी आहे. एक व्यक्ती त्या कारमध्ये पेट्रोल भरुन घेत आहे. कारमध्ये पेट्रोल भरल्यावर कर्मचारी पैसे घेण्यास जातो. मात्र तो कारचालक पैसे न देता तिथून पळ काढतो. त्याच वेळी कर्मचाऱ्याच्या लक्षात येताच तो त्याच्या गाडीची काच तोडतो. कर्मचारी त्याच्या गाडीवर हल्ला करतो. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेच आहे. मात्र, हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ first._.editor._.07 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला अनेकांनी पाहिले असून आपल्.या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, 500 चे पेट्रोल 3000 ची काच. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, कर्माचाऱ्याने एकदम बरोबर केले. आणखी एका युजरने म्हटले आहे की, आता त्यांना अक्कल येईल. चौथ्या एकाने म्हटले आहे की, त्याचा कार नंबंर सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे पोलिसांकडे तक्रार केली पाहिजे. मात्र हा व्हिडिओ कुठला आहे, कधीचा आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. सध्या हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.