फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी डान्स रिल्स तर कधी स्टंट व्हिडिओ, कधी जुगाड तर कधी भांडणाचे व्हिडिओ. याशिवाय चोरीच्या घटनांचे देखील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तुम्ही अनेकदा पाहिले असले की, चोरांचे प्लॅन बऱ्याचदा फसतात. अनेकदा चोरी करायला गेल्यावर ते स्वत:च मार खाऊन येतात किंवा असे काही तरी घडते की त्यांना चोरीचे सामान तिथेच सोडून जावे लागते.
सध्या असाच एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक चोर महिलेची पर्स चोरी करायला गेला होता अन् त्याच्यासोबत असे काही घडले आहे की, तो देखील आश्चर्यात पडला आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर हसा पिकला आहे. मात्र हा व्हिडिओ मनोरंजनासाठी बनवला गेला असल्याचे व्हिडिओवरुन दिसून येते आहे. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडिओ कुठला आहे हे कळालेले नाही.
चोराचा प्लॅन फसला
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चोर त्याच्या बाईकवर एका मुलीकडे येतो. तो तिच्या हातातून पर्स घेण्यासाठी धावतो त्याच वेळी मुलीला लक्षातच येताच की पर्स खाली जमिनीवर फेकते. चोर पर्स घेण्यासाठी गाडीवरुन उतरतो तेव्हा ती मुलगी गाडीकडे जाते. मग तो चोर हातातील पर्स टाकून गाडीकडे धावतो तर मुलगी पर्स उचलते. हे असे दोन तीन वेळी चालते. नंतर मुलगा पर्स उचलतो पण फेकून न देता गाडीकडे जातो त्याच वेळी मुलगी पर्स घेण्यास उतरलेली असते. संधी साधून मूलगा गाडीवर बसतो. मात्र मुलगी अचानक त्याला बाईकची चावी दाखवते. चोराला चकामक देण्यात मुलीने हुशारीने बाईकची चावी काढून घेतलेली असते.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रावर @safalbanoge या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, चोर खूप मूर्ख माणूस आहे, तर दुसऱ्या एकाने म्हटले आहे की, ताई हुशार आहे हा. तिसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, चोर मोठा गाढव आहे, तो पर्स घेऊनही बाईकवर जाऊ शकतो. चौथ्या एका युजरने म्हटले आहे की, मस्त ॲक्टिंग होती. अशा प्रतिक्रीया देत लोकांनी व्हिडिओचा आनंद लुटला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.