किती गोंडस! हत्तीने केली तरुणींच्या डान्सची नक्कल; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले...
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. अनेकदा चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात तर अनेकदा असे व्हिडिओ समोर येताता जे पाहून चेहऱ्यांवर आनंद येतो. प्राण्यांशी संबंधित असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. कधी मांजरींचे, तर कधी कुत्र्यांचे, तर कधी सापांचे. काही भितीदायक तर काही क्युट व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील.
सध्या असाच एक क्युट व्हिडिओ सोसल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या देखील चेहऱ्यावर हसू येईल. तुमचे मन अगदी आनंदी होऊन जाईल. हा व्हिडिओ एका हत्तीचा आहे. या हत्तीने तरुणींच्या डान्सची हुबेहुब नक्कल केली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. या गोंडस हत्तीचा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही.
हत्तीने केली हुबेहुब नक्कल केली
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन मुली पर्यटनासाठी फिरायला गेलेल्या आहेत. त्या ठिकाणी या मुली डान्स करत आहेत. त्या कथक करत आहेत. तिथेच एक मागच्या बाजूला हत्ती देखील आहे. तो हत्ती या तरुणी जसे करतील तसे नक्कल करण्याचा प्रयत्न करत आहे. हत्ती डान्स करताना सोंड आणि कान हवलवत आहे. तेथील संपूर्णपरिसर हिरवळीने नटलेला आहे. यामुळे हा डान्स आणखीनच सुंदर दिसत आहे. हा क्युट क्षण कॅमेरात कैद झाला आहे. मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
— Bhoomika Maheshwari (@sankii_memer) November 26, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @sankii_memer या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाइक केले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया देकील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, मुलींपेक्षा छान हत्तीने डान्स केला. दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, किती गोंडस. आणखी एका युजरने म्हटले आहे की, मस्तच. चौथ्या एका युजरने म्हटले आहे की, हत्ती गपती बाप्पाचे रुप आहे. असे वाटते की जणु बाप्पाच डान्सचा आनंद घेत आहे. हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.