फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात की पाहून आश्चर्य वाटते तर अनेकदा असे व्हिडिओ असतात की हसू आवरणे कठीण होऊन जाते. सध्या एक वेगळांच व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमागचे कारण ऐकून तुम्हाला हसावे की रडावे कळणार नाही. हा व्हिडिओ एका विमानतळावरचा आहे. सध्या हा विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलेला आहे.
गोवा विमानतळावर एक विचित्र घटना घडली आहे. या व्हिडिओमध्ये प्रवासी संतप्त झालेले दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गोव्याहून लखनऊला जाणारी फ्लाइट अचानक रद्द झाली यामुळे प्रवाशांना राग आला. यामुळे प्रवासी आणि विमानतळावरी स्टाफमध्ये जोरदार भांडणे सुरू झाली. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.चला जाणून घेऊयात नक्की काय घडले.
व्हायरल व्हिडिओत नेमके काय?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, विमानतळावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी जमलेली आहे. त्याच ठिकामी विमानतलावरी ग्रांउड स्टाफ देखील आहे. प्रवाशांनी फ्लाइट रद्द झाल्याचे कारण कळताच गोंधळ सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फ्लाइटमध्ये उंदिर आढळल्याने रद्द करण्यात आली आहे. यामुळे प्रवासी खूप संतापल्याचे दिसत आहे. स्टाफने सांगितले की, फ्लाइटच्या केबिनमध्ये उंदीरसापडला यामुळे सुरक्षेसाठी फ्लाइट रद्द करण्यात आली आहे. व्हिडिओत दिसत आहे की, प्रवासी स्टाफवर ओरडत आहेत. प्रवाशांमध्ये तीव्र आक्रोश दिसत आहे. एका प्रवाशाने प्रश्ना केला आहे की, उंदराला पकडायचे होते तर आम्हाला तासभर का बसवून ठेवले. फ्लाइट रद्द झाल्याची माहिती का नाही दिली.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
Kalesh b/w Ground staff and Passengers over Goa-Lucknow Indigo Flight cancelled after Rat spotted in Cabin pic.twitter.com/DrjYSMC16c
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) November 26, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी मजेशीर प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, उंदराला एअरपोर्टवर मोफत ट्रिप मिळाली, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, स्टाफने उंदरासाठी बिझनेस क्लासचे तिकीट बुक करायला हवे होते.आणखी एका युजरने म्हटले आहे की, हे काही भलतंच ऐकायला मिळत आहे. चौथ्या एकाने अलीकडे अशा घटना जास्त वाढल्या आहेत विमानांची देखील साफसफाइ होत नसेल असे म्हटले आहे. अशा प्रतिक्रीया लोकांनी दिल्या आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक कार
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.