फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या एक IPL Auction दरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नुकतेच IPL ऑक्शनपार पडले. यादरम्यान प्रत्येकटीम स्पॉन्सरने खेलाडू निवडले. यात सर्वात लक्ष वेधून घेतले ते मुंबई इंडियन्सच्या टीमने. मॅनेजमेंटने विचारपूर्वत आणि नियोजपद्धतीने टीम तयार केली आहे.
या टीममध्ये रोहित शर्मा, जसप्रित बुमराह, हार्दिक पांड्या, सुर्यकुमार यादव यांसारखे उत्तम खेळाडू निवडण्यात आले. दरम्यान या ऑक्शनदरम्यानच्या एक दृस्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडिओमध्ये टीमचे मालक आकाश अंबानी आणि निता अंबानी दिसत आहेत. निता अंबानींनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. निता अंबानी देवाची प्रार्थना करताना दिसत आहे. कोणतेही शुभ कार्य सुरू करण्याआधी प्रार्थना सर्वजण करतात. पण निता अंबानींनी ज्या पद्धतीने प्रार्थनाकेली आहे याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, IPL ऑक्शन सुरू होण्याआधी निता अंबानी आणि आकाश अंबानी टीम सिलेक्शमन करण्यासाठी कॉन्सरन्समध्ये बसलेले दिसत आहेत. त्याच वेळी निता अंबानींच्या हातात एक फाइल दिसत आहे. त्यामध्ये कदाचित खेळाडूंची यादी असेल. निता अंबानी आपला हात एकदा दोन्ही डोळ्यांना लावतात नंतर त्या हात डोक्यावरुन फिरवुन फाइलला लावतात. जसे आपण देवाच्या लांवूनपाया पडतो अगदी तसेच. तसेच त्या काही तरी उच्चारत असतात. त्या हे अशा रितीने करतात की पाहून असे वाटते की कोणता तरी तंत्र-मंत्र त्यांनी उच्चारला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @cricadiumcricket या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून लाइक केले आहे. निता अंबनींनी केले दृश्य पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत, एका युजरने म्हटले आहे की, बाई हा काय प्रकार. दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, बहुतेक हे पैसै मिळवण्याचे तंत्र असावे. आणखी एका युजरने म्हटले आहे की, श्रीमंत होण्यासाठी हा खास मंत्र आहे. तर काहींनी म्हटले आहे की, यामुळे MI IPL मधून आधीच बाहेर पडेल. तर काहींनी म्हटले आहे की, त्या फक्त प्रार्थना करत आहेत काही तंत्र मंत्र नाही असे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.