viral video father risks his life to save daughter video goes viral
Viral News Marathi: सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. शिवाय थरराक अपघातांचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. गेल्या काही काळात, रेल्वे, रस्ते विमान अपघातांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. नुकतेच गुजरातच्या अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघाताने जग हळहळून गेले आहे. याचे अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
सध्या आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक मुलगी रेल्वे रुळावर पाय घसरुन पडली होती. परंतु तिच्या वडिलांमुळे तिचा जीव वाचला आहे. बाप-लेकीच्या अनमोल नात्याचे हा व्हिडिओ उदाहरण आहे. यावरुन बाप आपल्या लेकरांसाठी स्वत:चा जीव धोक्यात घालण्यास कोणताही विचार करत नाही हे स्पष्ट होते. असेच काहीसे दृश्य या व्हिडिओमध्ये आहे. एका बापाने आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी आपले प्राण पणाला लावले आहेत. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी ट्रेनखाली पडल्याचे दिसत आहे. तर तिच्यावर तिचे वडिल मुलीला वाचवण्यासाठी ट्रेन जाईपर्यंत झोपून आहेत. तुम्ही पाहू शकता की मुलीन आपल्या वडिलांना घट्ट पकडलेवे आहे. दोघांच्या अंगावरुन ट्रेन जात आहे. प्लॅटफॉर्मवरील प्रवासी हे दृश्य पाहत आहेत, परंतु ट्रेन जाईपर्यंत कोणतीही मदत करण्यासाठी लोक हतबल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २०२० मध्ये घडली आहे. इजिप्तच्या इस्माउलियामध्ये ही घटना घडली होती. याचा व्हिडिओ सध्या पुन्हा एकदा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
Dad shields his daughter with his body after she stepped into a train’s pathpic.twitter.com/Blqs1UISc8
— Interesting things (@awkwardgoogle) June 16, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @awkwardgoogle या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने बाप-लेकीचं अनोखं नाते असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने मुलींसाठी तिचे वडिलच सुपरहिरो असतात असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.