लातों के भूत बातों से नही मानते! छेड काढणाऱ्या तरुणाला तरुणींनी दाखवले तारे; लाथ मारली अन्..., Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Viral news marathi : सोशल मीडियावर रोज मनोरंजक व्हिडिओ व्हायरल होत असतात. डान्स, स्टंट, जुगाड, यांसारखे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. सध्या एक मनोरंजात्मक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये काही तरुणी सायकल चालवत असतात. यावेळी एक तरुण त्यांचा पाठलाग करतो. या तरुणाला मुलींना चांगलाच धडा शिकवला आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, दोन तरुणी रस्त्यावर सायकल चालवत आहेत. याच वेळी एक तरुण स्केटिंग करत आहे. तरुण त्या तरुणींचा पाठलाग करत असून एका तरुणीच्या मागे सायकवर अचानक येऊन बसतो. तर याच वेळी दुसरी तरुणी सायकलवरुन मागून येऊन त्याच्या डोक्यात मारते. यामुळे तरुण तिच्या मागे तिला पकडायला जातो. तरुण दुसऱ्या मुलीला पकडणार इतक्यात मागून पहिली तरुणी त्याला लाथ मारते. यामुळे तरुण बाजूला असलेल्या गवतांमध्ये जाऊन पडतो. त्यानंतर त्या दोन्ही तरुणी हसायला लागतात. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
क्यो भाई आ गया स्वाद😎😎
अब दुबारा नहीं करेगा किसी लड़की के साथ
ऐसा 😁😁 pic.twitter.com/eEDlj1r4EB— Meenakshi Singh (@Meenaks06356943) June 15, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Meenaks06356943 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्जू आणि लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहे, एका युजरने अजून जोरात लाथ मारायला हवी होती असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने जबरदस्त असे म्हटले आहे, तर तिसऱ्या एकाने पुन्हा दुसऱ्या मुलींसोबत यांनी रील बनवली असे म्हटले आहे. यावरुन हा स्टंट रीलसाठी केले असल्याचे वाटते. तसेच काहींनी अशा लोकांना फटके दिल्याशिवाय कळत नाही असे म्हटले आहे. या ग्रुपचे असे आणखी व्हिडिओ देखील असल्याचे एका युजरने म्हटले आहे. त्यांना याशिवाय कोणता कंटेट मिळत नाही का असा प्रश्न एकाने केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.