viral video fierce fight broke out between women on saying worng word to mother video goes viral
अलीकडे एकमेकांना अपशब्ध बोलणं खूप सामान्य झालं आहे. लोक सहजा-सहजी आई-बहिणींवरुन अपशब्द बोलतात. पण अनेकदा यामुळे मोठे वाद देखील होतात. अनेकांना त्यांच्या आई-बहिणींवरुन बोलले आवडत नाही. मग अशा वेळी त्या लोकांना राग अनावर होतो आणि भांडण होतो. सध्या असाच एक महिलांच्या भांडणाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओवरुन लक्षात येते की भांडण करणाऱ्या महिलेच्या आईला दुसऱ्या एका महिलेने काहीतरी अपशब्द बोलले यामुळे मोठा वाद झाला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक महिला मोठ्या मोठ्याने ओरडत आहे. तिने एका महिलेने केस जोरदार धरले असून ती महिला जमीनीवर पडलेली आहे. तसेच तिथे इतर काही महिलांचा घोळका देखील आहे. केस धरलेली महिला मोठ्या मोठ्याने ओरडत पोलिसांना बोलाव, ती माझ्या आईला अपशब्द बोलूच कशी शकते असे म्हणत आहे. अनेकजण तिला त्या महिलेला सोडण्यास सांगत आहेत, परंतु ती महिला मोठ्या मोठ्याने ‘Shut up’ पोलिसांना बोलावा असे म्हणत आहे. याच वेळी दुसऱ्या महिलेचे केस चांगलेच ओढून धरलेले आहेत. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दिल्लीतील नोएडा येथे घडली असल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये दोन महिलांच्या ग्रुपमध्ये आईला अपशब्द बोलण्यावरुन मोठी भांडणे झाली आहेत की, भांडणे सोडवण्यासाठी पोलिसांना यावे लागले आहे. शिवाय पोलिसांना देखील भांडण सोडवण्याच नाकीनव झाली आहे. ही संपूर्ण घटना तिथेच जमा झालेल्या लोकांपैकी कोणी एकाने कॅमेरात कैद केली आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
No-Context Kalesh b/w two women at the main gate of Paras Season Society located in Sector 168, Noida.
pic.twitter.com/y9uafqdAc9— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) April 12, 2025
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म @gharkekalesh या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, ती अशा दिसतेय जसे की तिचा नवरा तिला रोज मारतो. दुसऱ्या एका युजरने मॅम पोलिसांनी बोलावू पण आधी त्या बाईल तर सोडा असे म्हटले आहे. आणखी एकाने महिलाच महिलेचे शत्रू आहे असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.