viral video fight over food at Madhya Pradesh Global Investor Summit 2025 video goes viral
मध्य प्रेदशची राजधानी भोपाळमध्ये ग्लोबल इन्व्हेस्टर समिटचे आयोजन करण्यात आले होते. या समिटमध्ये देश-विदेशातील मोठ-मोठे उद्योगपती आणि गुंतवणूकदार उपस्थित होते. दोन दिवस सुरु असलेल्या या समिटमध्ये उद्योजकांंनी मोठी गुंतवमूक केली. पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपर्यंत सर्वच या परिषदेसाठी उपस्थित होते. या समिटमध्ये अनेक क्षेत्रांत गुंतवणूक करण्यासाठी परदेशातूनच नव्हे तर देशातील लोकही यामध्ये सहभागी झाले होते. याच दरम्यान सोशल मीडियावर या समिटमधील एक धक्कादायक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमुळे ही ग्लोबल इन्व्हेस्टर समिट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. या कार्यक्रमांदरम्यान जेवणाच्या वेळी लोकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. लोक जेवणासाठी एकमेकांच्या प्लेट्स हिसकावून घेताना दिसत आहे. यामुळे कार्यक्रमांच्या आयोजितांची नाचक्की झाली आहे. एकीकडे गुंतवणूकीवर उद्योजकांमध्ये सहमती झाली दुसरीकडे मात्र, जेवणावरुन धक्काबुक्की झाली. लोक जेवणासाठी एकमेकांच्या प्लेट्स अक्षरश: हिसकावून घेत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
Madhya Pradesh Global Investor Summit 2025. 🙏 pic.twitter.com/z11HsdXXjP
— Indian Tech & Infra (@IndianTechGuide) February 27, 2025
नेटकऱ्यांंच्या प्रतिक्रिया
सद्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओ अनेकांना धक्का बसला आहे. या घटनेमुळे कार्यक्रमाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. क्रॉंग्रेसने देखील यावर प्रश्न उपस्थित केले आहे. सर्वसामांन्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती त्या ठिकाणी हा गोंधळ पाहायला मिळत आहे. लोकांच्या भांडणामध्ये अनेक प्लेट्स तूटुन पडलेल्या आहेत. एककीकडे 30 कोटी गुंतवणूकीचा दावा केला जात आहे तर दुसरीकडे जेवणासाठी भांडण सुरु आहे. एककीकडे मोठे उदयोगपती गप्पा मारत आहेत तर दुसरीकडे सर्वसामान्यांमध्ये मारामारी सुरु आहे.
राज्य सरकारवर या प्रतिमेचा खूप वाईट परिणाम होत असल्याची टिका अनेकांनी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ग्लोबल इन्व्हेस्टर समिटमध्ये जगभरातून जवळपास 25 हजार लोक सामील होण्यासाठी आले होते. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका युजरने हे इन्व्हेस्टर्स आहेत की भिकारी, तर दुसऱ्या एका युजरने या लोकांना भारताचे प्रतिनिधीत्व देखील करता आले नाही, जागतिक पाळीवर तर विसरुनच जा. तर आणखी एकाने हे कादचिक फक्त कासदारच असतील असे म्हटले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.