आनंदाला वय नसतं! आजीबाईंचा जबरदस्त डान्स पाहून तुम्हीही फॅन व्हाल; Video तुफान व्हायरल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अलीकडे सोशल मीडिया मनोरंजनाते एक माध्यम बनले असून यावर तुम्हाला अगदी लहानांसापून मोठ्या पर्यंत सर्वांचे व्हिडिओ पाहायला मिळतील. तुम्ही अनेक आजी-आजोबांच्या डान्सचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. अनेकदा हे व्हिडिओ पाहून आयुष्य असं आनंदात जगता आले पाहिजे असे वाटते. अलीकडच्या धावपळीच्या काळात तरुण पिढीला स्वत:साठी वेळ काढणे, सगळं दु:ख विसरुन आयुष्य आनंदात जगणे खूप कठीण जाते. मात्र बऱ्याचदा आपली जुनी पिढी आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमधून खूप काही शिकवून जाते.
आता हेच पाहा ना व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ एक आजी अगदी आनंदात मनसोक्त होऊन नाचत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांच्या पसंतीस पडत आहे. तुम्हालाही व्हिडिओतील आजींचा उत्साह पाहू डान्स करण्याची इच्छा होईल. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, हे दृश्य गावाकडेचे असून गावातील पुरुष आणि महिला कार्यक्रमासाठी एकत्र जमलेले आहेत. होम मिनिस्टरचा कार्यक्रम सुरु गावातील मंडळीतर्फे आयोजित केला असून एक व्यक्ती ॲंकरिंग करत आहे. याचवेळी तो दोन आजीसोबत जाऊन डान्स करु लागतो. गंगू तारुण्य तुझं बेमाफ गाणं सुरु असते. या गाण्यावर आजी देखील जबरदस्त ठेका धरतात आणि मनसोक्त डान्स करतात. ॲंकर देखील त्यांच्यासोबत डान्स करतो असतो. तर प्रेक्षक टाळ्यां वाजवत प्रतिसाद देत असतात.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @b_vishal_78 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी आजींवर कौतुकांचा वर्षाव केला आहे आहे. एका युजरने आयुष्य असं आनंदात जगता आलं पाहिजे, भारीच आजी असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, नादच खुळा! काय ठेका धरलाय. तर काहींनी आजीने डान्स करताना पदर पडून दिला नाही यामुळे त्यांचे कौतुक केले आहे. काही लोकांनी अलीकडच्या पिढीला असे संस्कार जमणार नाहीत असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायर होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.