viral video funeral, where people are dancing on dj video goes viral
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकदा आश्चर्यचकित करणारे व्हिडिओ देखील पाहायला मिळतात. सध्या एक वेगळाच व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एका वृद्ध महिलेची अत्यंयात्रा सुरु आहे. सहसा अत्यंयात्रेत अत्यंत दुख:चे वातावरण असते. अगदी शांततेने शोकयात्रा काढली जाते. पण ही अत्यंयात्रा ज्या पद्धतीने काढली जात आहे, ते पाहून तुमचे डोके चक्रावून जाईल. एवढेच नव्हे तर यमराज देखील गोंधळून जाईल. नक्की अत्यंयात्रा आहे का कोणाची वरात आहे, असा प्रश्न यमराजला पडेल.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, लोक आनंदाने नाचताना दिसत आहे. अगदी गुलाल उधळत डीजेच्या तालावर लोक नाचत आहे. हा व्हिडिओ पाहून कोणाची तरी वरात किंवा कोणता तरी जल्लोषाचा कार्यक्रम सुरु असल्याचे वाटत आहे. अनेकांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आश्चर्यकारक अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, एका गावात शोकयात्रा निघाली आहे. यामध्ये तिरडीला फुग्यांनी, झेंडूच्या फुलांनी सजवण्यात आली आहे. चार जण तिरडी खाद्यांवर घेऊन चालत आहेत. तर इतर लोक डीजेच्या गाण्यांवर बेभान होऊन नाचत आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉटर्म इन्स्टाग्रामवर @momindian17 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहे. एका युजरने “अरे, आजींचा जन्म झाला आहे की मृत्य,” असे म्हटले आहे. दुसऱ्या एका युजरने “माझ्या पण आजीची अत्यंयात्रा अशीच काढण्यात आली होती,” असे म्हटले आहे. तर आणखी एकाने “बहुतेक संपूर्ण गाव आजीवर नाराज होत वाटतं” असे म्हटले आहे. या सर्व प्रतिक्रियांवर अंदाज येतो, की अत्यंयात्रा एक वृद्ध महिलेची आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण व्हिडिओ नेमका कुठला आहे याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.