एका बाजूला रुद्र रुपातील नदी तर दुसऱ्या बाजूला झुलता पूल; तरुणाचा जीव घेणा खेळ पाहून सर्वच झाले अवाक, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ, तर कधी थरारक दृश्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या पावसाने वेळेआधीच हजेरी लावली आहे. सोशल मीडियावर तुम्ही या मुसळधार पावसाचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. या मुसळधार पावसामुळे देशाच्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसाने झाले आहे. दरम्यान अरुणाचल प्रदेशामध्ये देखील मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे अरुणाचल प्रदेशात पूरस्थिती आणि भूस्सखलनाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
अशा पूरग्रस्त परिस्थिती अरुणाचल प्रदेशातील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुण पूरग्रस्त नदीवरील एक झुलता पूल पार करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण आवाक् झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अरुणाचल प्रदेशातील अंजाव जिल्ह्यातील हा व्हिडिओ आहा.
यामध्ये एक तरुण धोकादायक झुलता पूल पार करताना दिसत आहे. एककीडे नदीला मोठा पूर आला आहे आणि दुसरीकडे जोरदार वारे देखील वाहत आहेत. अशातच हा तरुण हा जीवघेणा पूल पार करताना दिसत आहे. त्याच्या पाठीवर एक बॅग देखील आहे. हा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्यव्यक्त केले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
#ArunachalPradesh receives the heaviest #Monsoon rains in the world. A viral video shows a man crossing a traditional hanging bridge in #Anjaw district, Arunachal Pradesh near tri-junction of #India, #China & #Myanmar border. Please remain careful & safe. Govt will provide… pic.twitter.com/dQF6dpJzYF
— Surabhi🇮🇳 (@surabhi_tiwari_) June 2, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @surabhi_tiwari_ या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया देत आपले मत मांडले आहे. एका युजरने “त्याचा पाय घसरला तर, तो थेट..” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसऱ्या एकाने “त्याने कदाचित माऊंटेन डि्यू पिले असणार” असे म्हटले आहे. तर अनेकांनी आपला जीव कशाला धोक्यात घालायचा असे म्हटले आहे. तसेच काही लोकांनी अरुणाचल प्रदेशातील लोकांना काळजी घेण्यास आणि सुरक्षित ठिकाणी राहण्यास सांगितले आहे. सध्या हा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.