Viral Video Girl beatan Boyfriend with slipper on bike video goes viral
सोशल मीडियावर रोज लाको व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. तुम्ही रस्तावरुन जाताना अनेकदा अशा विचित्र घटना पाहिल्या असतील, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. रस्त्यावर कधी कोणी स्टंट करत असतो, कधी भांडण, तर कधी कोणी रस्त्यावर रील बनवत असतात. असे अनेक व्हिडिओ असतात. अलीकडे सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. काही व्हिडिओ असे असताता की पाहून हसावे का रजावे कळत नाही, तर काही आश्चर्याचा धक्का देणारे व्हिडिओ असतात.
सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशच्या लखनऊमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये धावत्या बाईकवर एक तरुणी तरुणाला मारहाण करत आहे. धक्कादायक बाब म्हणजे तरुणी चप्पलीने तरुणाला बेदम मारत आहे. व्हिडिओ संपेपर्यंत पाहिले तर जवळपास तरुणाला १४ वेळा चप्पलीने डोक्यात मार पडला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तरुण-तरुणी बाईकवरुन चालले आहेत. याच वेळी तरुणी अचानक तरुणाच्या डोक्यात चप्पलीने तीन-चार वेळा मारते. त्यानंतर तरुण डोक्याला हात लावून गाडी चालवत असतो. टर्न घेण्याच्या वेळी तरुणाने डोक्यावरुन हात काढताच तरुणी आणखी काही वेळ तरुणाच्या डोक्यात चप्पलीने मारहाण करते. अशातही तरुण गाडी चालवण्याचा प्रयत्न करत असतो. पण तरुणी मारायचे थांबवत नाही. हे दृश्य मागून जाणाऱ्या एका चारचाकी वाहनाच्या चालकाने कॅमेरात कैद केले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @gharkekalesh2 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने “याला घरगुती हिंसाचार नाही म्हणणार?” असा प्रश्न विचारलेला आहे. दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, “फॅमिली मॅटर आहे, मित्रांनो.” तर आणखी एकाने “नक्कीच पठ्ठ्याने काहीतरी केलं असणार” असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.