एक चूक अन्...! धावत्या बसमध्ये चढण्याचा तरुणीचा खतरनाक स्टंट; VIDEO व्हायरल
सोशल मीडियावर रोज दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. मजेशीर, चित्र-विचित्र, आश्चर्याचा धक्का देणारे व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. डान्स, जुगाड, स्टंट यासांरखे तर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अलीकडे स्टंट करण्याचे प्रमाणा खूप वाढले आहे. विशेष करुन तरुण-तरुणींमध्ये याचे जास्त प्रमाण आहे. तुम्ही अनेकदा बघितले असेल की, लोक धावती ट्रेन, बस पकडण्याचा प्रयत्न करतात.
धावत्या ट्रेन किंवा बसमध्ये चढताना आत्तापर्यंत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तरीही लोक सुधारण्याचे नाव घेत नाही. सध्या असाच एक धोकादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुणी धावत्या बसमध्ये खिडकीतून चढत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. हा व्हिडिओ कुठला आणि कधीचा आहे याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही मात्र, हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकती की, एक बस गर्दीने खचाखच भरलेली आहे. बसच्या गेटवर प्रचंड गर्दी दिसत आहे. लोक दरवाज्यात उभे राहिले आहेत. दरम्यान एक मुलगी बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहे. ती खिडकीतून बसमध्ये चढत आहे. बस नुकतीच चालायला लागलेली असते मात्र, त्याच वेळी बसचा वेग वाढतो. मुलगी तरीही बसमध्ये चढच असते. कसे तरी करुन ती खिडकीतून बसमध्ये चढते. मात्र, तिचा हात सटकला असता तर तिला गंभीर दुखापत झाली असती. यामध्ये तिचा जीव जाण्याची देखील शक्यता आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
दीदी ने बस में सीट पाने का बेहतरीन तरीका निकाला है
😂😂😂😂😂😂 pic.twitter.com/oGQ3HwAi4m— HasnaZarooriHai🇮🇳 (@HasnaZaruriHai) January 4, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @HasnaZaruriHai या अकाऊंटवर शेअर करण्याता आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘दीदींना बसमध्ये बसण्यासाठी एक चांगला मार्ग सापडला आहे’ असे लिहिले आहे. हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, “तुम्ही दीदींना हलके घेत आहात का?” आणखी एका यूजरने- “छोरी छोरो से कम है के.” असे म्हटले आहे. तिसऱ्या यूजरने म्हटले आहे की, “इथे दीदी भैया लोकांपेक्षा हुशार आहेत.” चौथ्या युजरने म्हटले आहे की, दिदी पडली असती तर मजा आली असती.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.