फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र- विचित्र असे व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या असाच एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ उत्तरप्रदेशातील वारणसी येथील असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये एक माकड वारणसीच्या कोर्टात घुसले असून सध्या या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. या व्हिडिओने राम मंदिराशी संबंधित 39 वर्ष जुन्या घटनेची आठवण करु दिले असल्याचे लोकांनी म्हटले आहे.
अन् माकड थेट न्याधीशांच्या टेबलावर
घटना अशी घडली की, वाराणसीच्या जिल्हा न्यालायामध्ये शनिवारी ज्ञानवापी खटल्याची सुनावणी सुरु होती. गरम्यान एक माकड न्यालयात आले अन् थेट न्याधीशांच्या टेबलावर जाऊन बसले. माकड संपूर्ण वेळ कधी सीजेएम न्यालयातील टेबलावर तर कधी न्याधीशांच्या न्यालयाच्या आवरात फिरत होते. त्याने कोणालाही कोणतीही दुखापत केली नाही आणि काही वेळानंतर ते तिथून निघून गेले. जवळपास तासभर सुनावणी सुरु होती. या प्रकरणाची सध्या भरपूर चर्चा रंगली आहे. अनेकांनी ही घटना कॅमेरात कैद केली असून सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
यापूर्वीची घटना
39 वर्षापूर्वी देखील अशी घटना 1 फेब्रुवारी 1986 रोजी घडली होती. त्यावेळी जिल्हा आणि सत्र न्याधीशांच्या आदेशानुसार आयोध्येतील वादग्रस्त खटल्यादरम्यान घडली होती. 1991 मध्ये प्रकाशित झालेल्या केएम पांडे यांनी त्यांच्या आत्मचरित्रात याचा उल्लेख केला आहे. त्यांनी सांगिले की, एक माकड कोर्टाच्या छतावर ध्वज चौकी धरुन बसले होते. लोक माकडाला फळे शेंगदाण खाण्यास देत होते. पण त्याने काही खाल्ले नाही. त्यानंतर निकाल लागल्यावर ते माकड निघून गेले. ती एक दैवी शक्ती होती असे लोकांनी म्हटले होते.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
वाराणसी- सीजेएम कोर्ट रूम में पहुंचा बंदर
जज की कुर्सी पर जा बैठा बंदर और टटोलने लगा सारी फाइलें
बंदर का वीडियो वायरल… pic.twitter.com/jgi1qOtJyF
— Rahul kumar Vishwakarma (@Rahulku18382624) January 4, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओची सध्या तुफान चर्चा सुरु आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अनेकांनी बजरंगबली सुनावणीला आल्याचे म्हटले आहे. एका युजरने म्हटले आहे की, ते न्यायाधीश योग्य न्याय करताता का हे पाहण्यास आले होते असे म्हटले आहे. हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.