फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर रोज काही नवा काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. डान्स, जुगाड, भांडण आणि स्टंट असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अलीकडे स्टंट करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. असे अनेक जीवघेण्या स्टंटचे व्हिडिओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या वेगाने व्हायरल होत आहे.
तुम्ही अनेकदा पाहिले असेल की, काही आगाऊ मुले त्यांना कितीही एखादी गोष्ट न करण्यास सांगितली तरी ते करत असतात. सध्या असाच एक खोडकर मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होच आहे. हा अतिउत्साही शैतान पाण्यात स्टंट करत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी डोक्याला हात लावला आहे. यामध्ये हा मुलगा एका स्विंमिंग पुलाजवळील घसरगुंडीच्या अगदी जवळ उभा राहून भलताच स्टंट करत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की काही लोक वॉटर पार्कमधील स्विमिंग पुलमध्ये मज्जा मस्ती करताना दिसत आहे. तिथेच एक तरुण देखील आहे. तो तरुण घसरगुंडीसमोर उभा राहिला आहे. त्या घसरगुंडीवरुन लोक भरधाव वेगाने खाली येते आहेत. तो त्यांनी घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, यामुळे त्या तरुणाचा आणि खाली येणाऱ्या मुलाचा मोठा अपघात होऊ शकतो हे त्या तरुणाच्या लक्षात येत नाही. तो असे सतत करत आहे. त्या तरुणाटा चुकनही अंदाज चुकला तर त्याच्या जीवावर बेतू शकते.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @memer.freak या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. अनेक लोकांनी आश्चर्य व्यक्त केले असून एकाने युजरने म्हटले आहे की”किती भयंकर लोक आहे ते”, तर दुसऱ्या एकाने “एकदा धडकला तर…” असे म्हटले आहे. आणखी एकाने म्हटले आहे की, याच्या आईवडिलांनी झोडपले पाहिजे याला म्हणजे अक्कल येईल. डोक्यावर आदळल्यावर कळेल याला असेही एकाने म्हटले आहे. मात्र, हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.