viral video girl unique hobby killing mosquito, keep their dead body, give name girls weird hobby video goes viral
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तुम्ही पाहिले असेल अनेकांना वेगवेगेळ्या छंदाची जपण्याची आवड असते. कोणाला डान्सची, तर कोणाला चित्रकलेची आवड असते. तसेच काहींना विशेष अशा वस्तू गोळा करण्याचाही छंद असतो. कोणाकडे महागड्या गाड्यांचे कलेक्शन, तर कोणाकडे महागड्या घडळ्यांचे कलेक्शन असते. तसेच काहींना जुनी नाणी गोळा करण्याचा, तर कोणाला काचेच्या बाटल्यांचे टोपण गोळा करण्याचा छंद असतो. कोणी शंख-शिंपले गोळा करते, तर कोणी बेन 10 चे कार्ड, कार्स ते स्टिकर्स असे बरेसते छंद असतात.
पण सध्या एक विचित्र छंद समोर आला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एक तरुणीला डासांना जपण्याचा विचित्र आणि हटके छंद आहे. एकूण विचित्र वाटले ना? पण होय हे खरं आहे. सध्या या मुलीच्या छंदाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. या मुलीला डासांना मारुन त्यांना जपण्याची, एवढंच नव्हे त्यांना नावे देण्याचा, सर्व तपशील ठेवण्याचाही छंद आहे. सध्या या विचित्र छंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मुलगी सर्व डासांना मारते, त्यांना एक कागदावर चिटकवते. तसेच ती त्यांना नावे देते. त्याच्यां मृत्यूची नोंद ठेवते. यामध्ये मुलीने सुरेश, रमेश, प्रिया, अशा नावे डासांना दिली आहेत. या डासांमध्ये एक सिग्मा बॉय देखील आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @akansha_rawat या अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओला लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, हा देखील एक अनोखा छंद आहे. दुसऱ्या एका युजरने, आजच्या काळात डासही सुरक्षित नाहीत असे म्हटले आहे, तर तिसऱ्या एका युजरने, बाईईईईईईईईई काय हा प्रकार असे म्हटले आहे. तसेच एकाने पूर्ण डास समुदायात भितीचे वातावरणे पसरले असले असे म्हटले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.