PSL मध्ये पठ्ठ्याचं मन रमेना; सामन्यादरम्यान मोबाईलवर पाहू लागला आयपीएल, VIDEO तुफान व्हायरल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
पाकिस्तान क्रिकेट नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत असते. सध्या पाकिस्तान सुपर लीग (PSL) आणि इंडियन प्रीमीयर लीग (IPL) एकाच वेळी सुरु आहे. पाकिस्तान प्रीमियर लीगचा 10 वा हंगाम सुरु आहे. 11 एप्रिल रोजी PSL सुरु झाली आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपासून पाकिस्कान क्रिकेटवर टीका केली जात आहे. सध्या एक PSL सामन्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा पाकिस्तानच्या क्रिकेटची इज्जत चव्हाट्यावर आणली आहे.
पीएसएलच्या एका सामन्यादरम्यान असे काही घडलं आहे की, सर्वांनाच धक्का बसला असून अनेकांनी पाकिस्तानची खिल्ली उडवली आहे, व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चाहता समोर पाकिस्तानचा PSL चा एक सामाना पाहत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या सामन्यादरम्यान एक तरुणाला झोप येऊ लागल्याने त्याने मोबाईलवर इंडिन प्रीमीयर लीग (IPL) पाहण्यास सुरुवात केली आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
समोर सुरु असलेला पीएसएलचा सामना सोडून चाहता फोनवर आयपीएल सामना पाहत आहे. हा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल झाला असून यावरुन लक्षात येते की, पाकिस्तान क्रिकेट केवळ विनोदाचा विषय नव्हे तर त्याच्या पीएसएलची लोकप्रियता देखील त्यांच्या चाहत्यांमध्ये कमी झाली असल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तान प्रीमीयर लीगच्या सामन्यांमध्ये रोमांच, उत्साह कमी दिसून येत आहे. सामना पाहण्यासाठी प्रेक्षकही अत्यंत कमी आले आहेत. संपूर्ण स्टेडियम अर्ध्यापेक्षा रिकामे असल्याचे दिसत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
People watching IPL instead of Psl.#RCBvsPBKS pic.twitter.com/u5IByjIMdP
— Indian Cricket Fc (@Jonathan_fcc) April 18, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Jonathan_fcc या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सध्या प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. यावर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लोक पीएसएलऐवजी आयपीएल पाहत आहेत असे लिहिले आहे. यापूर्वी देखील असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये पाकिस्तानच्या सुपर लीगमध्ये शतक झळकवणाऱ्या खेळाडूला पुरस्कार म्हणून हेअर ड्रायर देण्यात आला होता. हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाला होता.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.