"मेरे बॉयफ्रेंडसे गुलुगुलु करेगी तो...' तरुणासाठी दोन तरुणींची जोरदार हाणामारी; Video तुफान व्हायरल
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ पाहायला मिळतात. दर एक मिनिटाला काही ना काही नवीन व्हिडिओ पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो तर अनेकदा मजेशीर व्हिडिओ पाहायला मिळतात. स्टंट, जुगाड, भांडण यांसारखे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी भितीदायक तर कधी भावूक करणाऱ्या गोष्टी व्हायरल होत असतात.
तसेच तुम्ही महिलांच्या हाणामारीचे तर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. सध्या असाच एक दोन तरुणींचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दोन तरुणी जोरदार होणामारी करत आहेत. या तरुणी एका मुलासाठी भांडत आहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही. पुढे जे घडले आहे ते तुम्हीच पाहा. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, एका तरुणामुळे दोन तरुणींमध्ये राडा.
व्हिडिओत नेमके काय?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका इमारतीच्या बाहेर काही मुली दिसत आहेत. यामधल्या दोन तरुणी जोरदार भांडण करत आहेत. या तरुणी एकमेकींना लाथा-बुक्क्यांनी मारत आहे. एक तरुणी दुसऱ्या तरुणीला जमिनीवर पाडून मारत आहे. काही तरूणी त्यांची हाणामारी थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर काहीजण त्यांची गंमत पाहत आहेत. हे सर्व एका व्यक्तीने कॅमेरामध्ये रेकॉर्ड केले आहे.मात्र हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही.
व्हायरल व्हिडिओ
Cat-Kalesh b/w Two girls over a Guy
Source: Reddit
pic.twitter.com/7WbBZYarlJ— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) November 8, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर@gharkekalesh यावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून अनेकांनी व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, काय कारवे आता यांचे, दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की त्या नक्कीच पोरावरून भांडत असमार आहेत. तिसऱ्या एकाने म्हटले आहे, कुस्तीचा आखाडा. आणखी एका युजरने म्हटले आहे की, मुली कधीही कुठेही भांडायला सुरूवात करतात. पण काही असो बघून मज्जा आली. चौथ्या एकाने म्हटले आहे की, डब्लू डब्लू फाईट चालू आहे. अशा अनेक मजेशीर प्रतिक्रीया लोकांनी दिल्या आहेत.
टीप– हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.