फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ दर सेकंदाला व्हायरल होत असतात. अनेकदा असे व्हिडिओ आपल्यला पाहायला मिळतात की, आश्चर्याचा धक्का बसतो तर अनेकदा मनोरंजक व्हिडिओ पाहायला मिळतात की ते पुन्हा पुन्हा पाहतो. डान्स, रिल्स, जुगाड, स्टंट, भांडण तसेच लग्नाचे अनेकद व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. कधी लग्नातील कार्यक्रमांचे, कधी नवरा-नवरीच्या डान्सचे तर कधी घरातील नातेवाइकांचे असे भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
तुम्ही असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील ज्यामध्ये वयोवृद्ध लोक देखील आनंदाने डान्स करत असतात. अनेकदा हे लोक असे तल्लीन होऊन डान्स करतात की, त्याचे व्हिडिओ सोशल मीडियाीवर चांगले व्हायरल होतात. सध्या असाच एक भन्नाट असा आजींचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. मात्र हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही.
तल्लीन होऊन आजींचा भन्नाट डान्स
व्हायरल होत असेलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नाचे वातावरण आनंदाचे आहे आणि लोक डान्स फ्लोअरवर नाचत आहेत. वातावरण खूपच उत्साही दिसत आहे. त्यातच एक आजी देखील आनंदाने नाचताना दिसत आहेत. आजी अगदी तल्लीन होऊन डान्स करत आहे. इतर लोकही त्यांच्यासोबत आनंदाने नाचत असून डान्सचा आनंद लुटत आहेत. मात्र, एक काकू येऊन आजींना स्टेजवरुन घेऊन जातात. तरी देखील आजी पुन्हा येऊन नाचू लागतात. हे मजेदार दृश्य पाहून तेथील इतर लोक हसत असतात. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रावर@ghantaa शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, मी कधीही मरु शकते सांगून नातवाला लगन् करायला लावले. तसेच अनेकांनी व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, आजी रॉक, पब्लिक शॉक, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, आजी नादच खुळा. तिसऱ्या एकाने म्हटले आहे की, असे आनंदात जगता आले पाहिजे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.