पोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो, तर अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात की हसू आवरणे कठीण होऊन जाते. तसेचत अनेक अशा घटनांचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात की, पाहून लक्षात येते कोणसोबत कधी काय होईल सांगता येत नाही. अनेकदा काळ आला होता पण वेळ नाही या म्हणीप्रमाणे घटना तुम्ही पाहिल्या असतील किंवा अनुभवल्या असतील.
सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमचा देखील थरकाप उडेल.आयुष्यात कधी कोणावर वाईट प्रसंग येईल याची खात्री नाही. यामुळे जीवाचा काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे, पण तरी देखील लोक निष्काळजीपणाने वागतात. हा व्हिडिओ याचेच उदाहरण आहे. या व्हिडिओत एक माणूस टायवर बसून हवा भरत होता, पण त्याच्या सोबत अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होता की, तो हवेत उडून जमिनीवर आदळला.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका गॅरेजच्या बाहेर एक गाडी उभी आहे. तिथेच गाडीच्या बाजूल एक माणूस असून तो गाडीच्या टायरमध्ये हवा भरत आहे. पण तो टायरवर बसून हवा भरत आहे. त्याच वेळी अचानक टायरचा जोरात आवाज येऊन टायर फुटतो आणि तो व्यक्ती जोरात हवेलत उचलला जातो. हवेत उचलल्या गेल्यानंतर तो गाडीच्या दुसऱ्या बाजूला जाउन जोरात जमिनीवर आदळतो. हा अपघात होताच तिथे असलेले दोन व्यक्ती त्याच्या मदतीला धावून येतात.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रावर @motiv.ationallionn या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत अनेकानी पाहिले असून यावर आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, टायरमध्ये अशी हवा भरु नये कधी, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, आमच्या इथे देखील अशाच पद्धतीने एकाच जीव गेला होता. आणखी एका युजरने म्हटले आहे की, बाप रे असे म्हटले आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे म्हटले आहे की, आयुष्यात अशी चुक करु नका. मात्र, त्या माणसाला कोणती गंभीर दुखापत झाली नाही ना किंवा गी घटना कुठे घडली. याबाबत कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.