'हर एक फ्रेंड कमीना होता है...' नवरदेवाला घोडी मिळाली नाही म्हणून मित्रांनी केला 'असा' पराक्रम; VIDEO पाहून हसू आवरणार नाही
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. जुगाड, स्टंट, याशिवाय डान्स रिल्स, तसेच राशीबविष्य, करियर संबंधित व्हिडिओ, यासांरखे अनेक हास्यास्पद किंवा महितीपर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. याशिवाय ल्ग्नाचे देखील व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात.
सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. यामुळे या संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. मिरवणुकीचे व्हिडिओ देखील तुम्ही पाहिले असतील. अनेक ठिकाणी लोक नाचताना, जेवताना दिसतील. लग्नात वरासाठी एक गोष्ट महत्त्वाची असते. ती म्हणजे वराला घोडीवर बसून लग्नाची मिरवणूक काढणे. पण एका नवरदेवाला जेव्हा घोडी मिळाली नाही. अशा वेळी त्याच्या मित्रांनी असा पराक्रम केला आहे की याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. हे पाहून अनेकजणांना हसू आवरले नाही.
घोडीशिवया ल्गनाची मिरवणूक अपूर्ण मानली जाते. या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, यूपीमधील एका लग्नात काही वेगळेच पाहायला मिळत आहे. लग्नातील पाहुणे हॉटेलमध्ये पोहोचलेले दिसत आहेत. लोक लग्नाची मिरवणूक काढण्याच्या तयारीत आहेत. तेव्हा नवरदेवाच्या मित्रांना कळते की वराला नेण्यासाठी एकही घोडी सापडली नाही. त्याच्या मित्रांनी गुगलवर घोडीचा फोटो शोधून त्याचे प्रिंट्स काढले. घोडीचे फ्रंट प्रोफाइल, उजवी बाजू आणि डावी बाजू प्रोफाइल प्रिंट करण्यात आले. नंतर, वराच्या गाडीच्या पुढील, मागे आणि बाजूला घोडीचे चित्र चिकटवले जाते. नंतर मिरवणुक आनंदात निघाली.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @vankayl या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी व्हिडिओ मजेसीर प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, मजनू भाई की पेंटिंग याद आ रही है, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, भाई क्या आयडिया निकाला है. आणखी एका युजरने बरं झाले घोडी नाही मिळाली, तिला बिचारीला त्रास तर होणार नाही. तसेच चौथ्या एका युजरने म्हटले आहे की, कमीने दोस्त तर अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर केल आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.