दिल्ली मेट्रोच्या 'ब्ल्यू लाईन'वरील केबल चोरट्यांनी कापल्या; 'या' मार्गावरील मेट्रो सेवेला फटका
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात जे पाहून धक्का बसतो तो अनेकदा असे व्हिडिओ सोशल मीडियावर आपण पाहतो जे पाहून हसूनहसून पोट दुखून येते. कधी भांडण, कधी जुगाड, कधी स्टंट तर कधी इतके विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात की काय बोलावे ते सुचत नाही. दिल्ली मेट्रो तर सतत सोशल मीडियावर चर्चेत असते. सध्या असा एक व्हिडिओ दिल्ली मेट्रोचा सोशल मीडियावर पाहायला मिळता आहे.
तुम्ही दिल्ली मेट्रोचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. कोणी मेट्रोत डान्स करत आहे, तर कोणी सीटवरून भांडताना व्हिडिओ पाहायला मिळत आहे. तर कोणी मेट्रोमदध्ये कपल डान्स करत आहे, कोणी पत्ते खेळत आहे. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण हा व्हिडिओ काही वेगळाच आहे. दिल्ली मेट्रो मध्ये अशी एक अनाऊंसमेंट झाली आहे की, ऐकून तुम्ही देखील खळखळून हसाल. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
अनोखी अनाऊंसमेंट
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मेट्रोमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. अनेकजण त्यांच्या मोबाईल वापरताना दिसत आहेत. तेवढ्यात अचानक एक अनाऊंसमेंट होते. ही अनाऊंसमेंट जीवनसाथी.कॉम द्वारे करण्यात आल्याचे ऐकल्यावर तुमच्या लक्षात येईल. या अनाऊंसमेंट मध्ये म्हटले आहे की, प्रवाशांनी मेट्रोमध्ये नाचू नये, सरळ जीवनसाथी.कॉमवर यावे आणि आपल्या लग्नाच्या वरातीत नाचावे. हे ऐकून मेट्रोमधील प्रवाशांमध्ये हसू फुटले आहे. ही घोषणा विशेषत: अविवाहित लोकांना टार्गेट करून करण्यात आली आहे.
हे देखील वाचा- Viral Video: पिसारा फुलवून नाचत होता मोर इतक्यात वाघ आला अन्…; पाहा व्हिडिओ
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चर्चेत आहे. अनेकांनी या व्हिडिओला ऐकल्यांनंतर व्हिडिओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. तसेच अनेकांनी यावर भन्नाटच अशा प्रतिक्रीया देकील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, जाहिरातीची पद्धत जरा अनौपचारिक होती. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, हे फेक आहे एडिटिंग केले आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.