viral video Indian Bull Frog Eat Snake seen in Sindhudurg Hodavade village video goes viral
Viral News Marathi: सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र, तर कधी आश्चर्यकारक असे व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. वन्य प्राण्यांशी संबंधित अनेक अद्भुत व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, अगदी छोट्याशा किटकापासून ते मोठ्या प्राणी पक्ष्यांच्या जीवनशैलीबाबत अनेक रहस्यमयी गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा निसर्ग आपल्याला अशा अद्भुत आणि अचंबित करणाऱ्या घटनांचे दर्शन घडवतो. सध्या असाच एक अचंबित करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या व्हिडिओने सर्वजण थक्क झाले आहेत. यामध्ये एका बेडकाने सापाला गिळले आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सिंधुदुर्गमधील वेंगुर्ले येथील होडावडे गावात ही घटना घडली आहे. हे अचंबित करणारे दृश्य वन्यजीव अभ्यासक मंगेश माणगावकर यांनी त्यांच्या कॅमेरात कैद केले आहे. एका इंडियन बूल फ्रॉग प्रजातीच्या बेडकाने सापाला गिळले आहे.
इंडियन बुल फ्रॉग हा दक्षिण आणि आग्नेय आशियात आढळणारा सर्वात मोठा बेडूक आहे. या बेडकाची लांबी १७० मिलीमीटर म्हणजे ६.७ इंचापर्यंत वाढते. हा बेडूक हिरव्या आणि तपकिरी रंगात आढळतो. भक्षक स्वाभावासाठी ओळखला जाणाऱ्या या बेडकाने नानेटी या बिनविषारी सापाला गिळल्याचे दृश्य कॅमेरात कैद झाले आहे. हा बेडूक किटक, सरजडे, पाली, लहान साप, लहान पक्षी यांसारख्या प्राण्यांना खातो. हा बेडूक पाणथळ भागांमध्ये आढळून येतो. पावळ्याच्या काळात प्रजननासाठी बेडूक एकत्र येतात.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सध्या या भक्षकाचा अचंबित करु टाकणारा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने शिकारीच शिकार झाल्याचे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने हे कसं शक्य आहे असे विचारले आहे. अनेकांजण हा व्हिडिओ पाहून थक्क झाला आहे. निसर्गात अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचे गूढ अद्याप उलगडले नाही.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.